Latest

ISRO Update on Chandrayaan 3: चांद्रयान-३ बाबत इस्रोने दिली अपडेट; LVM-3 रॉकेटचा ‘हा’ भाग यशस्वीरित्या पॅसिफिक महासागरात कोसळला

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट दिली आहे. चांद्रयान-३ च्या LVM-3 रॉकेटचा वरचा टप्पा पृथ्वीच्या कक्षेत परतला आहे. तसेच तो यशस्वीरित्या पॅसिफिक महासागरात कोसळला असल्याचे देखील इस्रोने म्हटले आहे. चांद्रयान-३ ला नियुक्त कक्षेत यशस्वीपणे तैनात करण्यात LVM3 M4 प्रक्षेपण वाहनाचा क्रायोजेनिक भागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, असेही इस्रोने चांद्रयान-३ संदर्भातील माहिती देताना म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे.  (ISRO Update on Chandrayaan 3)

इस्रोने पुढे म्हटले आहे की, चांद्रयान-३ मधील LVM-3 M4 रॉकेटच्या बॉडी प्रक्षेपण वाहनाचा भाग होती. बुधवारी, आंतरराष्ट्रीय वेळेनुसार दुपारी २.४२ च्या सुमारास ते पृथ्वीच्या कक्षेत परतले. प्रक्षेपणानंतर १२४ दिवसांच्या आत रॉकेट बॉडीने पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश केला आहे. ॲक्सिडेंटल एक्सप्लोजनचा धोका कमी करण्यासाठी क्रायोजेनिक अप्पर स्टेजचा वापर केला जातो. त्यामुळे रॉकेट बॉडी LVM3 M4 प्रक्षेपण वाहनाचा अविभाज्य घटक होता, जो इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेच्या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचेही इस्रोने स्पष्ट केले आहे. (ISRO Update on Chandrayaan 3)

इंटर-एजन्सी स्पेस डेब्रिस कोऑर्डिनेशन कमिटी (IADC) द्वारे निश्चित केलेल्या २५ वर्षांच्या नियमानुसार, अंतराळ मोहिमेतील निकामी अवशेष हे प्रक्षेपणानंतर १२४ दिवसांच्या आत पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात. यानुसार पृथ्वीच्या वातावरणात कमी-पृथ्वीच्या कक्षेतील निकामी झालेले उपग्रह आणि रॉकेटचे टप्पे पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करतील याची खात्री करून, तसेच अवकाशातील ढिगारा कमी करण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेले असतात असेही इस्रोने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (ISRO Update on Chandrayaan 3)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT