Latest

Israel-Palestinian War: केरळमधील पॅलेस्टाईन समर्थनार्थ रॅलीत हमास नेत्याची ऑनलाईन हजेरी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या काही आठवड्यांपासून हमास-इस्रायलमध्ये युद्ध पेटले आहे. दरम्यान पॅलेस्टाईन समर्थनार्थ केरळमध्ये शुक्रवारी (दि.२७) रॅली काढण्यात आली. केरळमधील मलप्पुरम येथील सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंटने ही रॅली आयोजित केली होती. या रॅलीला हमास या दहशतवादी नेत्याने ऑनलाईन हजेरी लावली आहे. हमासचा नेता खालेद माशल यांने केरळमधील रॅलीला ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून  संबोधित केले आहे. या रॅलीवरून केरळमध्ये भाजप नेते आक्रमक झाले असूमन, वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Israel-Palestinian War)

पॅलेस्टाईन समर्थनार्थ केरळमध्ये काढण्यात आलेल्या  रॅलीत हिंदुत्त्वविरोधी देखील घोषणा दिल्या. सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये "बुलडोझर हिंदुत्व आणि वर्णभेदी झिओनिझम उखडून टाका" अशा घोषणा दिल्या. तसेच हिंदुत्व आणि झिओनिझमच्या विचारधारेवर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. (Israel-Palestinian War)

Israel-Palestinian War: पॅलेस्टाईनला पाठींबा देण्याचे केले आवाहन

दरम्यान ऑनलाईन हमास नेता खालेद माशल यांनी या रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी १९६७ मध्ये इस्रायलमध्ये उजव्या विचारसरणीचा राजकीय गट सत्तेवर आल्यापासून अल अक्साला नष्ट करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असल्याचे सांगितले. तसेच आम्ही मस्जिद अल अक्साला झिओनिस्ट विचारसणीच्या कृत्यांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे सांगत जगाला पॅलेस्टाईनच्या सैनिकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. (Israel-Palestinian War)

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅलीत सहभागी झाल्याने भाजप आक्रमक

जमात-ए-इस्लामी केंद्रीय परिषद सदस्य अब्दुसलाम अहमद यांनी रॅलीचे उद्घाटन केले. पॅलेस्टाईनमध्ये होत असलेल्या नरसंहारामध्ये वंशवाद्यांचा एक समूह गुंतला असल्याचे त्यांनी सांगितले. भारतही त्या समूहाचा भाग आहे आणि जगाने त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल केरळ भाजप युनिटने काँग्रेस कार्यकारिणी (CWC) सदस्य आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांच्यावर टीका केली आहे. (Israel-Palestinian War)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT