Latest

Israel-Palestine War : ‘गाझापट्टी खाली करा अन्यथा…’; इस्रायलच्या पंतप्रधानांचा हमासला इशारा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमास संघटनेने इस्रायलवर शनिवारी सात हजार क्षेपणास्त्रे डागल्यानंतर मध्य पूर्वेत युद्ध पेटले आहे. आजही इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध (Israel-Palestine War) सुरू असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी हमासला इशारा दिला आहे. 'हमासने गाझापट्टी खाली करावी अन्यथा हमासची नागरिक असलेली सर्व ठिकाणं आम्ही संपवणार,' असा इशारा पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिला आहे.

नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "हमास तैनात असलेल्या आणि लपलेल्या सर्व ठिकाणांना आम्ही नष्ट करू. गाझातील रहिवाशांनी ठिकाणे खाली करावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील," असा इशारा त्यांनी दिला आहे. (Israel-Palestine War)

दरम्यान, दक्षिण इस्रायलमध्ये इस्रायली लष्कर आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये अजूनही जोरदार संघर्ष सुरू आहे. इस्रायलमध्ये हमासने केलेल्या हल्ल्यात ३०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. हमासच्या हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायल संरक्षण दलाने सुरू केलेल्या ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्समध्ये गाझा आणि वेस्ट बँकमध्ये २३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर १६०० हून अधिक जखमी झाले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT