Latest

Hamas rocket attack : इस्रायलवरील रॉकेट हल्ल्यातील मृतांची संख्या ४० वर, जखमी ७०० हून अधिक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या  रॉकेट हल्ल्यातील मृतांची संख्‍या ४०वर पोहचली आहे, असे वृत्त 'एएनआय'ने द टाइम्स ऑफ इस्रायलचा हवाला देत दिले आहे. ( Hamas rocket attack)  दरम्‍यान, इस्रायलमध्‍ये प्रचंड तणाव असून, केंद्र सरकारने इस्रायलमधील भारतीयाना सतर्क राहण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

Hamas rocket attack : 'हमास'च्या दहशतवाद्यांची घुसखोरी

इस्रायलच्‍या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनुसार, रॉकेट हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या ७७९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'टाईम्स ऑफ इस्रायल'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, दहशतवादी संघटना हमासच्‍या दहशतवाद्यांनी देशाच्या दक्षिणेकडील अनेक भागात घुसखोरी केली आहे. तसेच पाच सैनिकांचे अपहरणही केले आहे.

हमासचा दहशतवादी कमांडर मोहम्मद देईफ याने इस्रायलवर जोरदार हल्‍ल्‍याचा इशारा दिला आहे, असे वृत्त जेरुसलेम पोस्टने वृत्त दिले आहे. दरम्यान, अनेक जागतिक नेत्यांनी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.हमासच्या सैनिकांची घुसखोरी आणि गाझामधून क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर इस्रायलने देशात आधीच युद्ध स्थिती जाहीर केली आहे.

इस्रायली सैन्य गाझा पट्टीच्या सीमेजवळील दक्षिण इस्रायलमधील वेगवेगळ्या ठिकाणी हमासच्या दहशतवाद्यांशी लढत आहे, ज्यात कफर अझा, सडेरोट, सुफा, नहल ओझ, मॅगेन, बेरी आणि रेइम लष्करी तळ या शहरांचा समावेश असल्‍याचेही 'द टाइम्स ऑफ इस्रायल'ने आपल्‍या वृत्तात नमूद केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT