इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी १७ जागा जिंकत राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची बाजार समितीवरील सत्ता अबाधित राहिली आहे. भाजप-शिवसेनेच्या शेतकरी परीवर्तन पँनेलचे हमाल गटातील उमेदवार संजय लाखे ७ मतांनी विजयी झाले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप- शिवसेनेच्या शेतकरी परीवर्तन पँनेलमध्ये थेट लढत झाली. सकाळी ८ वाजता येथील बचतधाम मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. हमाल गट वगळता सर्वच गटात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ७० टक्केच्या पुढे मतदान पडले. हमाल गटात मात्र भाजप-सेनेचा उमेदवार ७ मतांनी विजयी झाला. या गटात १० मतपत्रिका कोऱ्या होत्या. ती मते बाद ठरविण्यात आली. राष्ट्रवादीने फेर मतमोजणीची मागणी केली आहे. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
हेही वाचा :