Latest

सीट ‘ट्रेन’मधील की ‘विमाना’ची? रेल्‍वे मंत्र्यांनी सांगितले फोटोचे रहस्य

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी ट्विटरवर एका लहान मुलाचा फोटो शेअर केला आहे. फोटोमधील लहान मुल  सीटवर एका शालवर झोपले आहे. या सीटवरून ते खिडकीतून बाहेर बघत आहे; पण हे मूल 'ट्रेन'च्या सीटवर आहे की, 'विमाना'च्या? असा  प्रश्न रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी नेटकऱ्यांना केला आहे.

वैष्णव केलेल्या ट्विटमध्ये, "बेबी ऑन बोर्ड! प्लेन सीट या ट्रेन सीट?" असा प्रश्न नेटकऱ्यांना करण्यात आला. यानंतर असे दिसून आले आहे की, हे चित्र एका रेल्वेच्या डब्यातील आहे.  रेल्वे डब्यातील सीटवर लक्ष केंद्रीत करत आहे. या चित्राच्या माध्यमातून, रेल्वेने लांबच्या टप्प्याचा प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंसाठी भविष्यात बनवत असलेल्या सीटची झलक दाखवली आहे.

रेल्वे मंत्र्यांनी शेअर केलेल्या या फोटोला २८ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक केले आहे. लाखो नेटकऱ्यांनी हा फोटो पाहायला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील या फोटोने अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव हे नियमितपणे त्यांच्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते अनेक मनोरंजक चित्रे आणि संदेश सोशल मीडियावर शेअर करत असतात. गेल्या महिन्यात त्यांनी रेल्वे स्टेशनचे काही सुंदर फोटोदेखील पोस्ट केले आणि नेटकऱ्यांना ते ओळखण्यास सांगितले होते. त्यामध्ये, एक ट्रेन बर्फाच्छादित लँडस्केपमधून जाताना दिसत होती.

मागील वर्षी रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवरून श्रीनगर रेल्वे स्थानकाची अनेक छायाचित्रे शेअर केली होती. त्यात स्टेशन, रेल्वे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्म बर्फाने झाकलेले दिसत आहेत.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT