Latest

औरंगजेब पेट्रोलच्या दरवाढीला कारणीभूत आहे का? : असदुद्दीन औवेसी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी गुजरातमध्ये एका सभेत आज (मंगळवार) भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपला सगळीकडे मुघल दिसत आहेत, असे म्हणत औवेसी यांनी भाजपवर निशाणा साधला.

ते (Asaduddin Owaisi) पुढे म्हणाले की, भारतातील मुस्लिमांचा मुघलांशी कोणतीही संबंध नाही, असा दावा करत मुघल बादशाहांच्या पत्नी कोण होत्या ? सम्राट अशोकाने हत्या केल्या नाहीत का? औरंगजेब पेट्रोलच्या दरवाढीला कारणीभूत आहे का ? देशातील बेरोजगारीला अकबर जबाबदार आहे का ? असे सवाल उपस्थित केले. उद्या मीही म्हणेन पंतप्रधानांच्या घराखाली मशिद आहे, ते तुम्ही मान्य करणार का ? असा सवाल करून वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी भाष्य केले.

हेही वाचलंत का  ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT