Latest

पन्हाळागडावर सापडला लोखंडी तोफगोळा

backup backup

पन्हाळा, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडावर आंधरबाव परिसरातील तटबंदी सफाई करताना दगडाच्या खोबणीत लोखंडी फुटलेला २.७६६ किलोग्रॅम वजनाचा लोखंडी तोफ गोळा सापडला आहे. हा तोफ गोळा पुरातत्व विभागाच्या पन्हाळा कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुर्ग सेवा प्रतिष्ठान, कासारवाडी, टोप या संस्थेचे हौशी दुर्ग प्रेमी रोहन चेचर, संग्राम मुळीक, सौरभ लुगडे, प्रताप वरींगे, गौरव शिंदे व अन्य मित्र दर सोमवारी पन्हाळा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी येत असतात. आज सोमवारी सकाळी ते आले. पन्हाळा येथील अंधारबाव या वास्तुची साफ सफाई सुरू केली असता त्यांना तटबंदीच्या भिंतीत गोल आकाराचा लोखंडी गोळा दिसला.

हा तोफ गोळा असल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणांनी तातडीने पुरातत्व विभागाच्या कार्यालयात माहिती दिली आणि भिंतीतून हा गोळा बाहेर काढला असता तोफ गोळा अर्धा असल्याचे आढळून आले. या गोळ्यांचे  वजन केले असता तो २.७६६ किलो ग्रॅम भरले. सदरचा तोफ गोळा दुर्ग सेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते रोहन चेचर यांनी पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे जमा केला आहे.

तटबंदीत तोफ गोळा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि हा तोफ गोळा लोखंडी देखील आहे. पन्हाळा, पावनगड परिसरात दगडी तोफ गोळे सापडले आहेत. पण आतापर्यंत लोखंडी तोफ गोळा कधीही सापडला नव्हता. पन्हाळ्यात तीन दरवाजा जवळ आंधरबाव ही वास्तू आहे. इतिहास प्रसिद्ध सिद्धी जोहरच्या वेढ्यात वेढा फोडण्यासाठी इसवीसनाच्या १६०० मध्ये राजापूरच्या इंग्रजी वखारीकडून लांबपल्याच्या तोफांचा मारा पन्हाळगडावर तीन दरवाजाच्या बाजुने करण्यात आला होता. याच्या इतिहासात नोंदी सापडतात. त्याच कालावधीतील हा तोफ गोळा असावा, असे मत इतिहास अभ्यासक शिवप्रसाद शेवाळे यांनी सांगितले.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT