Latest

नवीन वर्षात रेल्वेने प्रवाशांना दिली खास भेट, IRCTC ने सुरु केली ‘ही’ सेवा

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून संक्रमण टाळण्यासाठी रेल्वेने अनेक मार्गांनी प्रवासी सेवांवर बंदी घातली होती. पण, आता भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने निर्णय घेतला आहे की, आता ट्रेनमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा दिल्या जातील. लोकांना आता पुन्हा एकदा ट्रेनमध्ये चविष्ट आणि हेल्दी जेवण मिळणार आहे. याबाबतचे आदेश सर्व संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

कोरोना महामारी सुरू झाल्यापासून ही सेवा प्रवाशांसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपवरून जेवण मागवता येत नव्हते. मात्र, आता 'आयआरसीटीसी'ने पुन्हा मोबाईल केटरिंग सेवा सुरू केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून कर्मचाऱ्यांना अधिक काळजी घेण्याच्या व स्वच्छतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ही खबरदारी घ्यावी लागेल

  1. जेवण बनवताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागेल.
  2. जेवण बनवताना लोकांना सामाजिक अंतर पाळावे लागेल.
  3. प्रत्येकाने फेस मास्क घालणे बंधनकारक असेल.
  4. सर्व कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाईल.

या संदर्भात एक निवेदन जारी करताना आयआरसीटीसीने म्हटले आहे की, आता प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच ट्रेनमध्ये त्यांच्या आवडत्या जेवणाचा आनंद घेता येईल. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की मोबाइल केटरिंग सेवा हा एक केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय आहे. आयआरसीटीसी अ‍ॅपद्वारे प्रवासी ट्रेनमध्ये मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंट्स आणि फूड आउटलेटमधून खाण्याची ऑर्डर बुक करू शकतात. यानंतर, ते आउटलेट खाण्याची ऑर्डर तुम्हाला बसल्या जागेवर पोहचवेल.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT