Latest

Iran-Israel Tension : इराणच्‍या क्षेपणास्‍त्रांचा हवेतच ‘खात्‍मा’! जाणून घ्‍या इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायल-हमास युद्धादरम्यान इराणने शनिवारी रात्री उशिरा इस्रायलच्या भूभागावर हल्ला केला. इराणने इस्रायलवर 300 हून अधिक डागलेली क्षेपणास्त्रे आम्‍ही रोखली आहेत, असा इस्रायलने दावा केला आहे. या हल्‍ल्‍याचे अनेक व्‍हिडिओही सोशल मीडियावर व्‍हायरल झाले आहेत. यामध्ये इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा हवेत क्षेपणास्त्रे नष्ट करताना दिसत आहे. जाणून घेवूया हवाई संरक्षण प्रणालीविषयी…

एरो मिसायल डिफेन्स सिस्टीम काय आहे?

इस्रायलच्या हवाई संरक्षण उद्‍योगाने अमेरिकेच्या क्षेपणास्‍त्र संरक्षण एजन्सीच्या सहकार्याने हवाई संरक्षण यंत्रणा तयार केली आहे. एरो मिसायल डिफेन्स सिस्टीम ही पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची प्रणाली आहे. १९८० मध्‍येच अमेरिकेच्या सहकार्याने इस्रायलने ही यंत्रणा उभारण्‍यास सुरुवात केली होती. अनेक यशस्वी चाचण्यांनंतर 1990 मध्ये एरो मिसाइल डिफेन्स सिस्टीम इस्रायली सैन्यात समाविष्ट करण्यात आली.

यानंतर इस्रायलने एरो मिसाईल डिफेन्स सिस्टमची यशस्वी चाचणी केली होती. या संरक्षण प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती एकाच वेळी चारही बाजूंनी येणारी क्षेपणास्त्रे नष्ट करू शकते. या यंत्रणेमध्‍ये शत्रूचे कमी आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्याची क्षमता आहे. एरो 2 आणि 3 प्रणाली असलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे इस्रायलमध्ये पोहोचण्यापूर्वी हवेत नष्ट केली जाऊ शकतात. आयर्न डोम कमी अंतरावरील ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट करण्याचे काम करतो. तर एरो मिसाईल डिफेन्स सिस्टमची लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांशी संबंधित आहे.

एकावेळी १४ क्षेपणास्त्रांना लक्ष्य करण्‍याची क्षमता

एरो एरियल डिफेन्स सिस्टममध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपक, फायर कंट्रोल रडार, प्रक्षेपण नियंत्रण केंद्र आणि युद्ध व्यवस्थापन केंद्राचा समावेश आहे. रडार प्रथम लांब पल्ल्याच्या लक्ष्यांचा शोध घेतो आणि एकाच वेळी अनेक लक्ष्यांना रोखू शकतो. एरो डिफेन्स सिस्टम एकावेळी १४ क्षेपणास्त्रांना लक्ष्य करू शकते. फायर कंट्रोल रडार रडार 2400 किलोमीटर अंतरावरील धोके ओळखू शकतो. जेव्हा एरो डिफेन्सच्या रडारला धोका आढळतो, तेव्हा नियंत्रण केंद्र रिअल-टाइम माहितीवर आधारित, धोक्याचा वेग आणि प्रक्षेपण शोधते आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपित करते. ॲरो डिफेन्सच्या हायपरसॉनिक स्पीडमुळे उपग्रहविरोधी शस्त्रेही त्याचे क्षेपणास्त्र भेदू शकत नाहीत.

इस्रायली लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'इराणकडून इस्रायलच्या दिशेने डझनभर क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती, परंतु इस्रायली लष्कराच्या संरक्षण यंत्रणेने या क्षेपणास्त्रांना हवेतच ओळखले आणि नष्ट केले. याशिवाय इस्रायलच्या सहयोगी देशांनीही यामध्ये मदत केली. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा हवेत क्षेपणास्त्रे नष्ट करताना दिसत आहे, ज्यामुळे इस्रायलच्या आकाशात फटाक्यासारखे दृश्य दिसत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT