Latest

आयपीएल शेड्यूल ठरलं, ६५ दिवस रंगणार थरार, २६ मार्चला चेन्नई-कोलकत्ता पहिला सामना

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल २०२२) स्‍पर्धेचे  शेड्यूल भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाने (बीसीसीआय ) जाहीर केले आहे. यंदा आयपीएलचा थरार २६ मार्चपासून रंगणार आहे.  चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्‍यात पहिला सामना हाेईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. यावर्षीच्या आयपीएलच्या हंगामातील सर्व सामने मुंबई आणि पुणे येथेच खेळवले जातील. असे बीसीसीआयने स्‍पष्‍ट केले आहे.

२८ मार्चला गुजरात टायटन्स वि. लखनऊ सुपर जायंट या नव्याने आयपीएल मध्ये समावेश झालेल्या संघांचा सामना होईल. आयपीएलचा लीग स्टेजमधील शेवटचा सामनाही मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना सनराईजर्स हायद्राबाद वि. पंजाब किंग्स असा होईल. बीसीसीआयने म्हटले आहे की, प्लेऑफच्या शेड्यूलची घोषणा नंतर केली जाईल. यावर्षी आयपीएल ६५ दिवस सतत चालणार आहे. यामधील १२ दिवस एकाच दिवशी दोन सामने खेळवले जातील. या दिवसांत पहिला सामना दुपारी साडेतीन वाजता तर दुसरा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.

एकाच दिवशी दोन सामने २७ मार्च पासून सुरू होतील. यातील पहिला सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडीयन्स वि. दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होईल. तर संध्याकाळचा सामना मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यामध्ये होईल.

आयपीएलचा अंतिम सामना २९ मे राेजी खेळवला जाईल. यावर्षीच्या आयपीएलच्या हंगामातील सर्व सामने मुंबई आणि पुणे येथेच खेळवले जातील. मुंबईमध्ये ५५ आणि पुण्यामध्ये १५ सामने खेळवले जातील. मुंबईच्या वानखेडे आणि डी.वाय.पाटील स्टेडियमवर २०-२० सामने खेळले जातील. तर मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आणि पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर १५-१५ असे सामने खेळले जातील.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT