Latest

CSK vs GT | ‘टायगर अभी जिंदा है!’ धोनीने टिपला ०.६ सेकंदात २.३ मीटर उडी मारून अप्रतिम झेल (Video)

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) शानदार झेल घेतला. खेळाडूचे वय ही फक्त एक संख्या आहे, हे धोनीने पुन्हा सिद्ध केले आहे. वयाच्या ४२ व्या वर्षीदेखील त्याने चपळता दाखवत अप्रतिम झेल घेतला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुरेश रैनानेही धोनीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत 'टायगर अभी जिंदा है…' अशी कॅप्शन दिली आहे. (CSK vs GT)

संबंधित बातम्या : 

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर मंगळवारी (दि.२६) झालेल्या सामन्यात (CSK vs GT) धोनीने (MS Dhoni) डॅरिल मिशेलच्या चेंडूवर विजय शंकरचा झेल घेतला. सामन्यादरम्यान एका क्षणी गुजरातने ३४ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर साई सुदर्शन आणि विजय शंकर क्रीजवर होते. हे दोघेही तामिळनाडूचे खेळाडू असून चेपॉक हे त्यांचे घरचे मैदान आहे. अशा स्थितीत दोघेही चेन्नई सुपर किंग्जसाठी धोका ठरू शकत होते. कर्णधार रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) चेंडू डॅरिल मिशेलकडे सोपवला. त्याने पहिल्याच षटकात विजय शंकरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मिशेलचा चेंडू शंकरच्या बॅटच्या बाहेरील कडेला लागून स्लिपच्या दिशेने गेला. धोनीने (MS Dhoni) डायव्ह मारून झेल घेतला. यादरम्यान त्याने सुमारे 2.3 मीटर उडी घेतली. त्यावेळी त्याचा रिॲक्शन टाइम एक सेकंदापेक्षा कमी होता.

'टायगर अभी जिंदा है…'

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ४२ वर्षीय धोनीने चपळता दाखवत मंगळवारी आयपीएलच्या सातव्या सामन्यात विजय शंकरचा आश्चर्यकारक झेल घेऊन चाहत्यांना थक्क केले. माहीने विजय शंकरचा ०.६ सेकंदाच्या रिअॅक्शन टाईमसह २.३ मीटर उडी मारून झेल घेतला. सामन्यात समालोचन करणारा सुरेश रैनानेही सोशल मीडियावर माहीचे कौतुक केले आहे. धोनीचा या झेलचा व्हिडिओ सुरेश रैनाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'हे लक्षात ठेवा, माही भाई नेहमीच मजबूत राहतो आणि सर्वांना प्रेरणा देत असतो. टायगर अभी जिंदा है…' असे रैनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. (CSK vs GT)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT