Latest

IPL 2023 : आणि चहलसोबत जो रूट थिरकला बॉलीवूडच्या गाण्यावर

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल हंगामात आतापर्यंत अनेक रंजक सामने झाले आहेत. जगभरातील खेळाडू सामन्यांच्या माध्यमातून मैदानावर चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. यासह मैदानाबाहेरही खेळाडू चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. या हंगामा दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आणि भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल डान्स करताना दिसत आहेत.

जो रूटला राजस्थान रॉयल्सने यंदा 1 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. नुकताच राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रुट चहलसोबत 'भरोसा तेरे प्यार पे' या प्रसिद्ध गाण्याच्या तालावर डान्स करताना दिसत आहे.

रुटला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. राजस्थान रॉयल्सने व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, आयपीएलमध्ये स्वागत आहे (युजी स्टाईलमध्ये) रूट! असे कॅपश दिले आहे. या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे आणि चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहत्यांनी व्हिडिओ शेअर करत पुष्पा फिल्ममधील 'ऊ अंटावा' हे गाणे असायला हवे होते यामुळे डान्स आणखी सुपरहिट ठरला असता.

हेही वाचा; 

SCROLL FOR NEXT