Latest

Devon Conway : लग्नानंतर कॉनवेची बॅट तळपली! CSK च्या ‘या’ खेळाडूचे विधान

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने डेव्हॉन कॉनवेच्या शानदार अर्धशतकाबद्दल मोठे विधान केले आहे. तो गंमतीने म्हणाला की कॉनवेने लग्न केल्यापासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आला असून त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. (Devon Conway)

डेव्हॉन कॉनवेने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त खेळी केली. त्याने अवघ्या 49 चेंडूंत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 87 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. यापूर्वीही एका सामन्यात त्याने अशीच फलंदाजी केली होती. (Devon Conway)

डेव्हॉन कॉनवे मात्र काही सामन्यांसाठी संघाबाहेर राहिला. लग्नामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. मात्र, पुनरागमन केल्यानंतर तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मोईन अलीने गंमतीने म्हटले की, डेव्हॉन कॉनवेसाठी लग्न भाग्यवान ठरत आहे. (Devon Conway)

फाफ डू प्लेसिस गेल्यानंतर आम्हाला फक्त कॉनवे सारख्या फलंदाजाची गरज होती : मोईन अली

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना मोईन अली म्हणाला, 'कॉनवेसाठी लग्न नक्कीच लकी ठरले आहे. लग्नानंतरच तेव्हापासून तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तो खूप धावा करणारा खेळाडू आहे. ऋतुराज गायकवाडसोबत त्याची भागीदारी चांगली झाली. फाफ डू प्लेसिस गेल्यानंतर आम्हाला ज्या प्रकारचा फलंदाज हवा होताचा. कॉनवेने ती गरज भरून काढली. तो उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्याचे शॉट्स अप्रतिम आहेत. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.' (Devon Conway)

IPL 2022 च्या 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांनी पराभव केला आणि मोसमातील चौथा विजय नोंदवला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळताना CSK ने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 208 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघ अवघ्या 117 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. (Devon Conway)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT