मुंबई, पुढारी ऑनलाईन : IPL Playoffs : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गुजरात टायन्सच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करत प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. म्हणजे चार जागांमधील एका जागेचे बुकींग झाले आहे. पण उर्वरीत तीन जागांसाठी आठ संघात मोठी चूरस पहायला मिळत आहे. अशातच पाच वेळचा मुंबई इंडियन्स संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून चार वेळचा चॅम्पियन चेन्नईचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग कठीण बनला आहे. चला जाणून घेऊया प्लेऑफचे गणित…
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणा-या गुजरात टायटन्सने काल (दि. १०) लखनौ सुपर जायंट्सला मात दिली. या विजयासह गुजरात IPL-2022 प्लेऑफसाठी तिकीट मिळवणारा पहिला संघ ठरला. या संघाचे १२ सामन्यांतून १८ गुण आहेत, तर त्यांचे अजून दोन सामने बाकी आहेत. यात आणखी एक विजय नोंदवलयास ते गुणतालिकेत 'टॉप'वर राहतील. (IPL Playoffs)
गुजरातचे शिल्लक सामने : विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (१५ मे) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (१९ मे)
केएल राहुल नेतृत्व करत असलेल्या लखनौ संघाकडे १६ गुण आहेत. त्यामुळे असे मानले जाते की या गुणांच्या जोरावर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील, पण अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी लखनौला किमान एक सामना जिंकावा लागेल. (IPL Playoffs)
लखनौ सुपर जायंट्सचे शिल्लक सामने : विरुद्ध राजस्थान रॉयल्स (१५ मे), कोलकाता नाइटराइडर्स (१८ मे)
गुजरात आणि लखनौ व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्सला टॉप २ मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. या संघाचे ३ सामने बाकी आहेत. या तिन्ही सामन्यांत विजय मिळवल्यास ते टॉप २ मध्ये पोहोचतील. तर एक विजय मिळवून ते प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करतील असे तज्ञांचे मत आहे. तथापि, नेट रनरेटवरही बरेच काही अवलंबून असेल. (IPL Playoffs)
राजस्थानचे शिल्लक सामने : विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (११ मे), लखनौ सुपर जायंट्स (१५ मे), चेन्नई सुपर किंग्ज (२० मे)
फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहली आहे. अनेक चढ-उतारांसह ते प्लेऑफ गाठतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच त्यांचे दोन सामने बाकी आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे १६ गुण होतील. पण त्यांचा नेट रनरेट निगेटीव्ह असल्याने त्यांचा १६ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर आहे. (IPL Playoffs)
आरसीबीचे शिल्लक सामने : विरुद्ध पंजाब किंग्स (१३ मे), गुजरात टायटन्स (१९ मे)
दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, पंजाब या चारही संघांचे प्रत्येकी १० गुण आहेत. मात्र यात दिल्लीचा नेट रन रेट पॉझिटीव्ह असून बाकीच्या तिन्ही संघांचा नेट रनरेट निगेटीव्ह आहे. दिल्लीचे तीन सामने शिल्लक आहेत. हे तिन्ही सामने त्यांनी जिंकले तर राजस्थान आणि पंजाबचा प्लेऑफचा रस्ता कठीण होईल. तर दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागल्यास त्यांचा प्लेऑफमधील मार्ग इतर संघांच्या भवितव्यावर अवलंबून असेल.
दिल्लीचे उर्वरित सामने : विरुद्ध राजस्थान रॉयल्स (११ मे), पंजाब किंग्ज (१६ मे), मुंबई इंडियन्स (२१ मे)
पॉइंट टेबलमधील टॉप-४ संघांव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांनाही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे, जरी ही संधी खूप कठीण दिसत असली तरी. दिल्लीने आतापर्यंत ११ सामने खेळले असून तीन सामने बाकी आहेत. सर्व सामने जिंकल्यास त्याला १६ गुण होतील, त्यामुळे NRR चे महत्त्व वाढेल. दिल्लीप्रमाणेच हैदराबाद, पंजाबचीही अशीच अवस्था आहे.
कोलकात्याबद्दल सांगायचे तर, त्यांनी १२ सामने खेळले असून त्यात त्यांनी १० गुण मिळवले आहेत. त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे केवळ १४ गुण होऊ शकतात. चेन्नई सुपर किंग्जला अजून ३ सामने खेळायचे आहेत, तिन्ही सामन्यात विजय मिळवून ते १४ गुणांपर्यंत मजल मारू शकतात. असे झाल्यास शेवटपर्यंत प्लेऑफसाठी संघ निश्चित करणे कठीण होऊ शकते. मात्र, १४ गुणांसह संघाला प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
उर्वरित सामने : विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (१४ मे), मुंबई इंडियन्स (१७ मे), पंजाब किंग्ज (२२ मे)
उर्वरित सामने : विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (१३ मे), दिल्ली कॅपिटल्स (१६ मे), सनरायझर्स हैदराबाद (२२ मे)
कोलकाता, चेन्नई संघांच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा भंगण्याच्या मार्गावर आहेत. कारण ४ संघांचे १४ पेक्षा जास्त गुण आहेत, तर या दोन संघांनी त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले तर ते १४ गुणांपर्यंत मजल मारू शकतील. पण एखादा करिष्मा त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळवून देऊ शकतो असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
कोलकाता नाइट रायडर्स (१२ सामने, ५ विजय, ७ पराभव, १० गुण, -०.०५७ नेट रनरेट)
कोलकाताचे उर्वरित सामने : विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (१४ मे), लखनौ सुपर जायंट्स (१८ मे)
सीएसकेचे उर्वरित सामने : विरुद्ध मुंबई इंडियन्स (१२ मे), गुजरात टायटन्स (१५ मे), राजस्थान रॉयल्स (२० मे)