Latest

IPL 2022 : CSK आणि KKR यांच्यात होणार IPL चा पहिला सामना!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल (IPL 2022)च्या १५ व्या सीझनचे बिगुल २६ मार्चपासून वाजणार आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना गतवर्षीचा विजेता चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR) या सघांदरम्यान खेळला जाणार आहे. कोविड १९ मुळे दहा संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील निम्म्याहून अधिक सामने मुंबईतच होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही आयपीएल यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी महाराष्ट्र सरकार आणि बीसीसीआय (IPL 2022) यांच्यात बैठक झाली. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष नार्वेकर यांनी आम्ही बीसीसीआयला पूर्ण पाठिंबा देऊ असे म्हटले आहे. महाराष्ट्र सरकार स्पर्धेदरम्यान संघांना स्वतंत्र लेन प्रदान करेल जेणेकरून खेळाडूंना हॉटेल, प्रशिक्षण स्थळ आणि स्टेडियममध्ये पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही. प्रेक्षकांना मैदानावर परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यंदाच्या आयपीएल हंगामात दहा संघांमध्ये ७० सामने खेळवले जाणार आहेत, त्यापैकी ५५ सामने मुंबईतील तीन स्टेडियममध्ये (वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियम) खेळले जातील. (CSK vs KKR)

IPL 2022 मोसमातील पहिला सामना धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयपीएल २०२१ चा अंतिम सामना सीएसके (CSK) आणि केकेआर (KKR) यांच्यात झाला होता. सीएसके तो सामना २१ धावांनी जिंकून आयपीएलचे चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. या वर्षी सीएसकेने अनुभवी आणि स्टार फलंदाज सुरेश रैनाला आपल्या संघात स्थान दिलेले नाही. त्यानंतर आयपीएलच्या लिलावातही त्याला कोणत्याही फ्रँचायझींनी विकत घेतले नाही. (CSK vs KKR)

महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला स्पर्धेदरम्यान संघांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देण्याचे अश्वासन दिले आहे, जेणेकरून हॉटेल, प्रशिक्षण स्थळ आणि स्टेडियमपर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येऊ नये. वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम संघांना सरावासाठी देण्यात आले आहेत. (CSK vs KKR)

SCROLL FOR NEXT