Latest

Internet Shutdown In India : भारतात ११ वर्षांत ६९७ वेळा इंटरनेटबंदी

अमृता चौगुले

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतातील नेटबंदीचा डेटा जमविणार्‍या इंटरनेटस् शटडाऊन इननुसार 2012 पासून ते आतापर्यंत भारतात एकूण 697 वेळा नेटबंदी झाली आहे. जगात इंटरनेट शटडाऊनच्या (नेटबंदी) सर्वांत जास्त (84 वेळा) घटनांच्या बाबतीत 2022 मध्येही भारत जगभरात अव्वल ठरला आहे. (Internet Shutdown In India)

सलग पाचव्या वर्षी ही स्थिती कायम आहे. नेटबंदीमुळे डिजिटल पेमेंटवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसतो. पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅनिंग थांबणे म्हणजे एका मोठ्या लोकसंख्येची कमाई थांबणे हा अर्थ होतो. बँकांच्या सर्व ऑनलाईन ट्रान्झेक्शनसह यूपीआय पेमेंट बंद होणे, हा त्याचा अर्थ होतो. अशात चालू 2023 च्या पहिल्या 2 महिन्यांतच देशात 7 इंटरनेट शटडाऊन्स् झाले आहेत. भारतात 2017 पासून नेटबंदीचे प्रमाण वाढत गेले. (Internet Shutdown In India)

इंटरनेटबंदीने नुकसान (Internet Shutdown In India)

नेटब्लॉक्सच्या हिशेबाने एका तासाच्या भारतव्यापी नेटबंदीने 442 कोटी रुपयांचे नुकसान होते, तर एक दिवसाच्या नेटबंदीने 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होते.

देशाच्या आकारमानाचा या आकडेवारीशी संबंध नसतो. देशाचा जीडीपी आणि देशातील इंटरनेटच्या प्रभावाच्या आधारे संभाव्य नुकसानीची ही आकडेवारी काढली जाते.

इंटरनेटबंदीत आघाडी

  • जम्मू-काश्मीर : कलम 370 हटवल्यानंतर नेटबंदी 552 दिवस राहिली.
  • राजस्थान : 2012 पासूनच्या नेटबंदीनुसार हे राज्य याबाबत दुसर्‍या स्थानी
  • उत्तर प्रदेश : 11 वर्षांत 30 वेळा नेटबंदी झाली आहे. हे राज्य तिसर्‍या स्थानी

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT