Latest

Interim Budget 2024 : ‘एक कोटी घरांना सौरऊर्जेद्वारे मिळणार मोफत वीज ‘

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन आज ( दि. १) अंतरिम अर्थसंकल्‍प सादर केला. सौरऊर्जेच्या माध्यमातून एक कोटी घरांना सौरऊर्जेद्वारे दरमहा ३०० युनिट मोफत वीज मिळू शकेल, असा विश्‍वास सीतारमन यांनी व्‍यक्‍त केला. ( interim budget 2024 solar roof top scheme )

सौरऊर्जेद्वारे 15-18 हजार रुपयांची बचत होणार आहे. ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी मोठ्या प्रमाणात स्थापना केली जाईल. त्यामुळे विक्रेत्यांना काम मिळेल, असेही त्‍यांनी सांगितले. ( interim budget 2024 solar roof top scheme )

पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण याअंतर्गत तीन कोटी घरे बांधली जाणार

'मध्यमवर्गीयांसाठी योजना तयार केली जाईल. भाड्याची घरे, झोपडपट्ट्या आणि अनियमित घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना नवीन घर विकत घेण्याची किंवा बांधण्याची संधी मिळेल. पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण याअंतर्गत तीन कोटी घरे बांधली जाणार आहेत. त्यापैकी दोन कोटी घरे येत्या पाच वर्षांत बांधण्यात येणार असल्‍याची माहिती अर्थमंत्री सीतारमन यांनी दिली. ( interim budget 2024 solar roof top scheme )

"जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संशोधन'

नवीन तंत्रज्ञान व्यवसायाला मदत करत आहे. लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान, जय किसानचा नारा दिला होता. अटलजींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञानाचा नारा दिला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानचा नारा दिला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ आहे. १ लाख कोटी रुपयांचा निधी बिनव्याजी किंवा कमी व्याजदराने वितरित केला जाईल. यामुळे दीर्घकालीन आर्थिक मदत मिळेल. यामुळे खाजगी क्षेत्राला मदत होईल, असेही त्‍यांनी सांगितले.

३ कोटी 'लखपती दीदी' करण्‍याचे लक्ष्‍य

नऊ कोटी महिलांचा समावेश असलेल्या ८३ लाख बचत गटांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तिच्या यशामुळे एक कोटी महिलांना लखपती दीदी बनण्यास मदत झाली आहे. ते इतरांसाठी प्रेरणास्थान आहेत. लखपती दीदींसाठीचे लक्ष्य 2 कोटींवरून 3 कोटी रुपये करण्याचे आम्ही ठरवले आहे.

मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस देणार

सध्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांचा वापर करून आम्ही अधिक वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करू. आमचे सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस देणार आहे. मातृत्व आणि बालकांच्या विकासासाठी सर्वसमावेशक योजना तयार केली जाईल. अंगणवाडी केंद्रे अद्ययावत करण्यात येणार आहेत. पोषण 2.0 ची अंमलबजावणी जलद केली जाईल. लसीकरण बळकट केले जाईल. आयुष्मान भारत अंतर्गत, सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना त्याच्या कक्षेत आणले जाईल, अशी घोषणाही सीतारमन यांनी केली. ( interim budget 2024 solar roof top scheme )

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT