पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवार दि. ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुरूवारी १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (Interim Budget 2024
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी उद्या मंगळवारी ३० जानेवारी रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, असेदेखील एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Interim Budget 2024)