Latest

रायगड : पैशाची बॅग चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; सात गुन्हे उघडकीस

अनुराधा कोरवी

पनवेल ः पुढारी वृत्तसेवा :  व्यापा-यांचा पाठलाग करुन त्यांच्या कारच्या काचा फोडून पैशाची बॅग चोरणार्‍या आंतरराज्यीय टोळीस गुन्हेशाखा कक्ष 2 पनवेल कडुन अटक करून त्यांच्या कडून 07 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

संबंधित बातम्या 

मागील काही दिवसांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये एपीएमसी मार्केट तसेच इतर मार्केटमधील व्यापा-यांवर पाळत ठेवून त्यांच्या कारचा पाठलाग करुन त्यांच्या नकळत पार्क केलेल्या कारची काच फोडून कार मध्ये ठेवलेली पैशाची बॅग चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली होती. यामुळे नवी मुंबई परिसरातील व्यापा-यांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

अशाप्रकारच्या गुन्हयांत झालेली वाढ लक्षात घेता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह. पोलीस आयुक्त संजय ऐनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांनी कारची काच फोडून पैसे चोरीस जाण्याच्या गुन्हयांना आळा घालण्याबाबत व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलीस पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या अशा गुन्ह्यांची माहिती प्राप्त करुन त्यांच्या घटनास्थळांना भेटी देवून आरोपीच्या येण्याजाण्याचे मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज वरून अशा प्रकारचे गुन्हे करणारी एक विशिष्ट आंतरराज्यीय टोळी नवी मुंबई परिसरात सक्रीय झाल्याचे निष्पन्न झाले.

सदरचे आरोपी हे घणसोली परिसरातील एका मैदानात अशाच प्रकारचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याबाबत तांत्रिक तपासाद्वारे तसेच गोपनिय बातमीदाराकरवी माहिती प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने तात्काळ सदर ठिकाणी जावून सापळा रचून अजय गोपाळ चौहान, वय 38 वर्षे,व रोहन अशोक कंजर, वय 24 वर्षे या दोन आरोपींना त्यांनी गुन्हयात वापरलेल्या नंबर प्लेट नसलेल्या एक्सेस स्कुटीसह ताब्यात घेण्यात आले, नमूद दोन्ही आरोपींना अटक करून आरोपींकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासात एक मोटर सायकल, एक सेलोरीओ कार तसेच पत्नीच्या खात्यातील फ्रिज केलेली रक्कम असे एकूण 13,64,052/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करून या गुन्हयातील पाहिजे आरोपी यांचा सुरू आहे. या आरोपींनी आता पर्यंत वाशी पोलीस ठाणे , दिंडोशी पोलीस ठाणे व शिळ डायघर पोलीस ठाणे येथे यापूर्वी गुन्हे केले आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि प्रविण फडतरे, पोउपनि मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनिल गिरी, पो.हवा. मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, रमेश शिंदे, अनिल पाटील, अजित पाटील, निलेश पाटील, सागर रसाळ, दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, राहुल पवार, जगदिश तांडेल, पो.ना. आजिनाथ फंदे, विक्रांत माळी, नंदकुमार ढगे, अमोल मोहिते, मपोशि अदिती काकडे यांनी केलेली आहे. सदर अटक आरोपीकडून न्हावाशेवा पोलीस ठाणे,एपीएमसी पोलीस ठाणे येथील दोन गुन्हे ,सानपाडा पोलीस ठाणे, पनवेल शहर पोलीस ठाणे,नेरुळ पोलीस ठाणे, खारघर पोलीस ठाणे येथील दाखल गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT