Latest

Insurance company: चालकाचे लायसन्स कालबाह्य झाले तरी भरपाई द्यावीच लागेल; विमा कंपनीला हायकोर्टाचा दणका

मोनिका क्षीरसागर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा: रस्ते अपघाताला कारणीभूत ठरलेल्या गाडीच्या चालकाचे लायसन्स कालबाह्य झाले असले तरी विमा कंपनीला मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई ही द्यावीच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने विमा कंपनीला चांगलाच दणका दिला.
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स लिमिटेड या विमा कंपनीला सहा आठवड्यांत महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई (Driver's license) देण्याचा आदेश दिला आहे.

पुण्यातील आशा बाविस्कर ही महिला दुचाकीवरून पुण्यातील हडपसरकडे जात असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार दिली. या अपघातात महिलेचा ट्रकखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने अपघातग्रस्त गाडीच्या चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स कालबाह्य झाल्याच्या आधारे विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्यापासून सूट देताना मृत महिलेच्या कुटुंबीयांना ट्रक मालकाने नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला.

या आदेशाला महिलेच्या कुटुंबीयांनी आव्हान दिले होते. त्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांनी सुनावणी करताना ग्राहकाला दिलासा देणारा निर्णय दिला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT