Latest

INSACOG : कोरोनाचा ‘हा’ व्हेरिएंट भारतात तीव्र गतीने पसरतोय पण…

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : कोरोनाच्या संकटातून सावरत आहे असे वाटतानाच कोरोनाच्या नवनवीन सब व्हेरियंटमुळे चीनसह अनेक देशात पुन्हा कोरोनाच्या संकटाने डोके वर काढले आहे. भारतात देखील कोरोनाबाबत सरकार कडक उपाययोजना करत आहेत. सरकारने देशात आढळणा-या नवीन कोविड वेरिएंटचा शोध घेण्यावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले आहे. या दरम्यान इंडियन सार्स-सीओवी-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) ने आपल्या बुलेटिनमध्ये भारतात कोविड ओमिक्रॉन चा XBB हा सब व्हेरियंट सर्वात जास्त सक्रिय आहे, अशी माहिती दिली आहे.

INSACOG ने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा ओमिक्रॉन आणि त्याचे सब व्हेरिएंट भारतीय रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यात ओमिक्रॉनचा XBB हा व्हेरिएंट संपूर्ण भारतात सर्वात जास्त सक्रिय आहे. त्याचे प्रमाण तब्बल 63.2 टक्के आहे. याशिवाय देशात कोविडचे BA.2.75 आणि BA.2.10 व्हेरिएंट देखील सक्रिय आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण कमी आहे. BA.2.75 हा व्हेरिएंट उत्तर-पूर्व भारतात सक्रिय आहे. मात्र, अद्याप याची गंभीरता किंवा रुग्णालयात भरती होणा-या रुग्णांमध्ये कोणतीही वाढ दिसून आलेली नाही.

XBB संपूर्ण भारतात पसरतोय

INSACOG ने असे ही म्हटले आहे की, ओमिक्रॉनचा XBB सब व्हेरिएंट संपूर्ण भारतात पसरत असला तरी हा जास्त धोकादायक नाही. याने संक्रमित रुग्ण लवकर बरे होतात. INSACOG ने 5 डिसेंबरच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे XBB चा संक्रमण दर प्रतिदिवस 500 पेक्षा कमी आहे. तर BA.2.75 आणि BA.2.10 या व्हेरिएंटचा संक्रमण दर देखील मागील आठवड्यात कमी होता. हे आपल्यासाठी दिलासादायक आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT