Latest

जून महिन्‍यात ‘जीएसटी’ संकलन १,६१,४९७ कोटी, वार्षिक १२ टक्‍के वाढ : अर्थ मंत्रालय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जून २०२३ मध्ये एकत्रित वस्‍तू आणि सेवा कर ( जीएसटी) महसूल १,६१,४९७ कोटी रुपये झाले असून कर महसूल संकलनात वार्षिक वाढ १२ टक्‍के इतकी वाढ नोंदवली गेली आहे, अशी माहिती आज ( दि.१) अर्थ मंत्रालयाने दिली. यापूर्वी एप्रिल २०२३ मध्‍ये १.८७ लाख कोटी रुपयांचे विक्रमी जीएसटी संकलन झाले होते. तर मे महिन्‍यात ही आकडेवारी १,७५,०९० कोटी इतकी होती. मासिक जीएसटी महसूल मागील १५ महिन्‍यात १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. देशभरात जीएसटी लागू झाल्‍यापासून एकणू महसुलाने चौथ्‍यांदा १.६ लाख कोटी रुपयांचा टप्‍पा ओलांडला आहे. ( GST Revenue collection )

अर्थ मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, आर्थिक वर्ष २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ च्‍या पहिल्‍या तिमाहीत सरसरी मासिक एकूण जीएसटी संकलन अनुक्रमे १,१० लाख कोटी, १.५१ लाख कोटी आणि १.६० लाख कोटी रुपये आहे, ही आकडेवारी जीएसटीच्‍या सहाव्‍या वर्धापन दिनानिमित्त अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आहे.

वस्‍तू आणि सेवा कर ( जीएसटी) आकारणी हा देशाच्‍या इतिहासातील एक महत्त्‍वाचा टप्‍पा आहे. जूनमध्ये जमा झालेल्या एकूण जीएसटी महसूलापैकी सीजीएसटी 31,013 कोटी रुपये, सीजीएसटी 38,292 कोटी रु. , आयजीएसटी  80,292 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या रु. 39,035 कोटींसह) आणि उपकर रु. 11,900 कोटी (संकलित रु.281 कोटींसह) आहे.

नियमित सेटलमेंटनंतर जूनमध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी ६७,२३७ कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी ६८,५६१ कोटी रुपये आहे, असे अर्थ मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. दरम्‍यान, देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल हा गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा १८ टक्‍के अधिक आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT