Latest

Sustainable Aviation Fuel : स्वदेशी इंधनावर पुण्यातून झेपावले पहिले विमान; ‘एसएएफ’ ग्रीन फ्युलचा वापर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नात असलेल्या विमानातील स्वदेशी इंधनाचा प्रयोग शुक्रवारी (दि.१९) यशस्वी झाला. पुणे विमानतळावरून स्वदेशी इंधनावर उडणारे पहिले विमान मुंबईच्या दिशेने झेपावले आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. (Sustainable Aviation Fuel)

इंडियन ऑईल आणि प्राज कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत विमान इंधनाचा प्रयोग यशस्वी झाला आणि पहिले व्यावसायिक विमानाचे उड्डाण यशस्वी झाले. याप्रसंगी एअर एशिया इंडिया आणि एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंग, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, इंडियन ऑईलचे अध्यक्ष वैद्य व अन्य उपस्थित होते. (Sustainable Aviation Fuel)

स्वदेशात उत्पादीत केलेले एसएएफ हे इंधन वापरून हवाई उड्डाण हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. उर्जा स्वातंत्र्य आणि हरित क्रांतीच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे. आता आकाश कार्बन मुक्त होईल.
– डॉ. प्रमोद चौधरी, संस्थापक अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज

अर एशिया इंडिया, इंडियन ऑईल आणि प्राज इंडस्ट्रीज यांच्या एकत्रित प्रयत्नाने शाश्वत विमान इंधनाचा प्रयोग यशस्वी झाला. याचा आनंद झाला. पर्यावरणातील कार्बनचा प्रभाव कमी करण्यासाठी हे मोठे पाऊल आहे.
– अलोक सिंग, व्यवस्थापकीय संचालक, एअर एशिया इंडिया

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT