Latest

भारताचा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने रचला इतिहास! ३२ वर्षानंतर अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्णपदक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : १६ वर्षीय भारतीय कुस्तीपटू सूरज वशिष्ठने (Indian wrestler Suraj Vashishth) इटलीतील रोम येथे झालेल्या ग्रीको-रोमन अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (Greco-Roman U-17 World Championship) सुवर्णपदक जिंकले आहे. १९९० मध्ये पप्पू यादव या स्पर्धेत विजेता ठरला होता. त्यानंतर ३२ वर्षानंतर अंडर १७ वयोगटात ग्रीको-रोमन वर्ल्ड चॅम्पियन बनणारा सूरज वशिष्ठ पहिला भारतीय आहे. जागतिक स्तरावरील ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये भारताला अद्याप सुवर्णपदक मिळालेले नसले तरी, कनिष्ठ वयोगटातील देशाचे हे चौथे पदक आहे. भारतीय युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने ५५ किलो वजनी गटात युरोपियन चॅम्पियन अझरबैजानच्या फरेम मुस्तफायेवचा ११-० असा पराभव केला.

पप्पू यादवने १९९० आणि १९९२ मध्ये अनुक्रमे U17 आणि U20 गटात सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, विनोद कुमारने १९८० मध्ये ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये U17 गटात सुवर्णपदक जिंकले होते. आता सूरजने ३२ वर्षानंतर अंडर-१७ गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला असल्याचे United World Wrestling ने ट्विट करत म्हटले आहे.

"माझ्या वजन गटात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे माझे स्वप्न होते. वरिष्ठ गटातही विश्वविजेतेपद जिंकणे हे देखील माझे एक स्वप्न आहे," असे सूरज वशिष्ठने सुवर्णपदक जिंकल्यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगशी बोलताना म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT