Latest

Indian Tour of Pakistan : भारताच्या पाकिस्तान दौऱ्याबाबतचा निर्णय सरकार घेईल : रॉजर बिन्नी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत २०२३ च्या आशिया चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाणार का नाही याबाबतचा निर्णय बीसीसीआय घेऊ शकत नाही. भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाणार की नाही? याबाबतचा निर्णय केंद्र सरकार घेईल, असे रॉजर बिन्नी म्हणाले आहेत. कर्नाटक क्रिकेट असोशिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Indian Tour of Pakistan)

रॉजर बिन्नी म्हणाले, भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत केंद्र सरकार सोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. भारतीय संघ हा दौरा करणार की नाही? याबाबतचा निर्णय केंद्र सरकार घेईल. भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्याचा निर्णय बीसीसीआयचा नाही. पाकिस्तानचा दौरा करण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज आहे. आम्ही आपला देश सोडून इतर देशात सामने खेळण्यासाठी जायचे की, भारतातचं सामने खेळायचे? या दोन्ही बाबींसाठी सरकारच्या परवानगीची गरज असते. (Indian Tour of Pakistan)

एकदा सरकारने दौऱ्यासाठी हिरवा कंदिला दाखवला की भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करेल. बीसीसीआय याबाबत निर्णय स्वत:  घेऊ शकत नाही. आम्हाला सरकारवर विश्वास ठेवावा लागेल, मात्र आम्ही अद्याप सरकारशी संपर्क साधलेला नाही, असेही रॉजर बिन्नी यावेळी बोलताना म्हणाले.  २०२३ चा आशिया चषक पाकिस्तानात खेळवला जाणार आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानला रवाना होणार नाही, असे म्हटले होते. यानंतर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Indian Tour of Pakistan)

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT