Latest

IMD @ 150 : इथे उलगडते हवामानाच्या अभ्यासाची ‘सृष्टी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  इंग्रजांनी सिमला येथील हवामान विभागाचे कार्यालय शहरातील शिवाजीनगर भागात स्थलांतरीत केले. या ठिकाणी 1928 मध्ये अतिशय भव्य अन् देखणी दोन मजली दगडी वास्तू उभारण्यात आली. तेथे त्या काळात तयार केलेले लाकडाचे ग्रंथालय विलोभनीय आहे. भारतीय हवामान विभागाला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. इंग्रजांनी 15 जानेवारी 1874 रोजी भारतीय हवामान विभागाची स्थापना केली. त्या निमित्ताने पुणे हवामान विभागातही विविध कार्यक्रम होत आहेत. त्यानिमित्ताने पुणे वेधशाळेची वेगळी माहिती वाचा खास पुढारीत..

विलोभनीय फर्निचर…
शिवाजीनगर येथील हवामान विभागाला आता पुणे वेधशाळा असे संबोधले जाते. याचे खरे नाव सिमला हाऊस आहे. कारण सिमला येथून हे कार्यालय शहरात स्थलांतरीत करण्यात आले. 1928 रोजी इंग्रजांनी ही सुंदर इमारत खास हवामान विभागासाठी बांधून सुपूर्द केली. पहिल्या मजल्यावर चढून गेल्यावर डाव्या हाताला लाकडी वाचनालय तुमचे लक्ष वेधून घेते. आत जाताच सागवान व शिसम लाकडांचे पॉलीश केलेले संपूर्ण फर्निचर पाहून वाह.. सुंदर.. असेच उद्गार निघतात.

1928 मध्ये झाले ग्रंथालय
हे ग्रंथालय 1928 मध्ये तयार झाले. पण, आज तब्बल 96 वर्षांनंतरही केवळ सुस्थितीत नाही तर नवेकोरे वाटावे इतके सुंंदर आहे. यामध्ये प्रामुख्याने हवामानशास्त्र आणि संबंधित विषयांची ज्ञान संसाधने आहेत. याठिकाणी जणू हवामानविषयाशी संबंधित वेगळे जगच आपल्यासमोर उलगडते.

13 हजार 500 पुस्तकांचा खजिना
या वाचनालयात जुनी हस्तलिखिते, हवामानशास्त्र आणि संबंधित विषयांच्या डेटाचा मोठा संग्रह आहे. त्याचे डिजिटायझेशन होत आहे. यात तब्बल 13 हजार 500 पुस्तके, 40 हजार बंधनकारक मालिका आणि 5 हजार हवामानविषयक पुस्तिका आहेत.

1822 ची हवामान नोंदवही
या ठिकाणी 1822 च्या मद्रास येथील ईस्ट इंडिया कंपनीच्या वेधशाळेतील हवामान नोंदवही (मेमोयर्स ऑफ आयएमडी व्हॉल्यूम) इथे पहावयास मिळते. इथे 1878 पासून आजपर्यंतची हवामानशास्त्रीय मोनोग्राफ मालिका वैज्ञानिक नोट्स, तांत्रिक नोट्स जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT