Latest

Indian Idol 13 – ऋषी सिंग इंडियन आयडॉलचा विजेता, बक्षीसात काय काय मिळालं?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऋषी सिंगने 'इंडियन आयडॉल सीझन १३' चे विजेतेपद पटकावले आहे. (Indian Idol 13 ) ऋषीने सोनाक्षी कर, शिवम सिंग, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती आणि देवोस्मिता रॉय यांना हरवून ट्रॉफी जिंकली. सोशल मीडियावर लोक आधीच दावा करत होते की तो शो नक्कीच जिंकेल. (Indian Idol 13 )

रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये ऋषी सिंग विजेता, देवोस्मिता रॉय द्वितीय आणि चिराग तृतीय आला. ऋषीला २५ लाख रुपये आणि मारुती सुझुकी एसयूव्ही कार आणि चमकदार ट्रॉफी मिळाली. याशिवाय ऋषी सिंगला सोनी म्युझिक इंडियासोबत रेकॉर्डिंगचा करारही मिळाला आहे. नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया 'इंडियन आयडॉल १३'चे परीक्षण करत होते. तर आदित्य नारायण सूत्रसंचालन करत होता.

विजेता झाल्यानंतर ऋषी सिंह म्हणाला- 'माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. जेव्हा माझे नाव विजेते म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. या महत्त्वाच्या शोचा वारसा पुढे नेणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चॅनेल, परीक्षक आणि इंडियन आयडॉलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे.

SCROLL FOR NEXT