पुढारी ऑनलाईन डेस्क : आज एकीकडे फायटर रिलीज होत असून फायटरच्या निर्मात्यांनी चाणक्यपुरी नवी दिल्ली येथे भारतीय हवाई दलासाठी या चित्रपटाचा विशेष प्रीमियर ठेवला होता. (Fighter Movie ) भारतभरातील १०० हून अधिक भारतीय वायुसेना अधिकारी यांनी या प्रीमियरला हजेरी लावली आणि या चित्रपटाचा अनोखा अनुभव घेतला. (Fighter Movie)
संबंधित बातम्या –
भारतीय वायुसेनेच्या मार्शल्ससाठी हा विशेष प्रीमियर हा एक स्टार-स्टडेड सोहळा होता. ज्यात दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि फायटर निर्माती ममता आनंद यांच्यासह हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर या कलाकारांनी हजेरी लावली होती. हवाई दलाचे प्रमुख (CAS) एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी फायटरचे खास कौतुक केलं. या महत्त्वाच्या घटनेने भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या. त्यांना हा चित्रपट केवळ आवडला नाही तर तो "सर्वोत्कृष्ट चित्रपट" आहे, अशा प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या. भारतीय वायुसेनेच्या बँडने वंदे मातरमचे अनोखं सादरीकरण सुद्धा केलं.
सोबतचं Marflix Pictures सोशल मीडिया वर शेअर केले – " Tune that echoes in the sky ??
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित अतूट धैर्याने देशाच्या देशाचे रक्षण करणार्या IAF अधिकार्यांचे शौर्य आणि समर्पणाचे चित्रण या चित्रपटात आहे. Marflix Pictures च्या संयुक्त विद्यमाने Viacom18 Studios द्वारे सादर Fighter हा हृदयाला भिडेल असा चित्रपट आहे.