Latest

#IndiaAt75 : विकसित भारत, गुलामगिरीतून मुक्ती….पंतप्रधान मोदींनी दिले पंचप्राण, २५ वर्षांचे टार्गेट

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी (दि.१५ ऑगस्ट) दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित केले. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी पाच संकल्प (पंच प्रण) केले आहेत. विकसित भारत, गुलामगिरीच्या मानसिकतेचा वंश राहणार नाही, वारशाचा अभिमान, देशवासीयांची एकता आणि एकजुटता, नागरिकांच्या कर्तव्याचे पालन असे हे पंचप्राण असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. पुढील २५ वर्षे देशासासाठी महत्वाची असतील, असेही त्यांनी नमूद केले. पुढील २५ वर्षांत देश स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल. तोपर्यंत हे पाच संकल्प पूर्ण करायला हवेत. २०४७ मध्ये स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होत असताना हे पंचप्राण घेऊन स्वातंत्र्यप्रेमींची स्वप्ने पूर्ण करायची आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या संपूर्ण भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांनी ध्वजारोहण केले. गुलामगिरीच्या छोट्या गोष्टीपासूनदेखील आपल्याला मुक्ती मिळावयाची आहे. देशासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. एक म्हणजे भ्रष्टाचार आणि दुसरे आव्हान म्हणजे भाऊबंदकी, घराणेशाही. एकीकडे असे लोक आहेत ज्यांना राहायला जागा नाही आणि दुसरीकडे असे लोक आहेत ज्यांना चोरीचा माल ठेवायला जागा नाही. ही स्थिती चांगली नसल्याची खंत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे….

  • भारत लोकशाहीची जननी आहे.
    ७५ वर्षांमध्ये देशावर अनेक संकटे आली.
    राष्ट्रध्वजासाठी अनेकांनी बलिदान दिले.
    देशवासियांचे सामर्थ्य राष्ट्रध्वजाने दाखवले.
    स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर विश्वाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.
    जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहे.
    हे परिवर्तन ७५ वर्षांच्या वाटचालीचा परिणाम आहे.
    मी याला त्रिशक्तीच्या रुपात पाहतो.
    गेल्या तीन दिवस देश तिरंगामय झालाय.
    राजकीय स्थिरतेचे काय महत्व आहे, हे भारताने दाखवले.
    सबका साथ सबका विकास या विचारात देशवासियांनी त्यांच्या सामर्थ्याने आणखी रंग भरले.
    पूर्ण ताकदीने देशाची आगेकूच सुरू.
    देशाला खूप मोठे संकल्प घेऊन चालावे लागेल.
    पंचप्राण जागृत करावे लागेल. हे पंचप्राण ५ मोठे संकल्प असतील.
    विकसित भारत.
    गुलामीच्या बेड्या अंतर्मनातून तोडणे.
    आपल्या वारशावर अभिमान असायला हवा.
    एकभारत श्रेष्ठभारतसाठी एकता आणि एकजूटतेची भावना वाढीला लावणे.
    नागरी कर्तव्यांचे पालन करणे.
    देशासाठी पुढची २५ वर्षे महत्वाची असून विकसित भारत म्हणून देशाचा विकास व्हावा.
    नवीन शैक्षणिक धोरण गुलामीतून मुक्ती देईल.
    जग देशाच्या योग आणि आयुर्वेदाकडे अभिमानाने पाहतो.
    विविधता हीच भारताची शक्ती.
    कुटुंब व्यवस्था ही भारताची ताकद.
    कोणत्याही कृतीतून महिलांचा अपमान होणार नाही, असा संकल्प घ्या.
    नारीचा गौरव ही राष्ट्राची खूप मोठी पूंजी.
    सरकारची जबाबदारी आणि नागरी कर्तव्य योग्य पार पडले तर दोन्ही गोष्टी एकसोबत चालल्या तर निश्चितच विकसित भारत, प्रगत भारताचे लक्ष्य पूर्ण करू.
    स्वदेशीतून स्वराज्य, स्वराज्यातून सुराज्य हे आपल्याला अस्तित्वात आणायचे आहे.
    कोरोना काळात लसीचा विक्रम.
    स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर पहिल्यांदा स्वदेशी तोफांची राष्ट्रध्वाजाला सलामी ही गर्वाची बाब.
    आत्मनिर्भर भारत योजनेत लष्कराचे मोठे योगदान.
    भारत मॅन्यूफॅक्चरिंग हब बनत आहे. देश वेगाने प्रगती करत आहे.
    वंदे भारत ट्रेन विश्वासाठी आकर्षण.
    सेंद्रीय नैसर्गिक शेती आत्मनिर्भर भारताला ताकद देणारी.
    रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत.
    आम्हाला भारताच्या सामर्थ्यावर विश्वास आहे.
    आपल्या ७५ वर्षाचा अनुभव आहे आहे. ऑप्टीकल फायबरमध्ये सुद्धा आपण काम केले आहे. देशाच्या ७५ वर्षांत प्रवासात नारी शक्तीचे मोठे योगदान.
    आरोग्य, पोलीस, खेळाचे मैदान किंवा सुरक्षा व्यवस्था असो अशा अनेक क्षेत्रात महिलाशक्ती आपल्याला पाहिला मिळत आहे. ही महिला शक्तीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण शक्ती या देशाच्या मुली आणि महिलांसाठी लावणार आहोत.
    येत्या २५ वर्षांत अनेक मोठे संकल्प आहेत. विकसित भारत हा पहिला संकल्प आहे.
    भ्रष्टाचार आणि घराणेशाही या देशातील मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे आम्हाला या गुलामगिरीपासून मुक्तता पाहिजे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT