Latest

India VS England : हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू खेळीने भारताचा 50 धावांनी विजय

Arun Patil

साउथॅम्टन ; वृत्तसंस्था : हार्दिक पांड्याने केलेल्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा (India VS England) ५० धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या अष्टपैलू खेळाडूने प्रथम शानदार फलंदाजी करत अवघ्या 33 चेंडूत 51 धावा केल्या आणि नंतर चार विकेट्स घेतल्या.199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 19.3 षटकांत 148 धावांत आटोपला.

इंग्लंडचा संघ १९९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. पण भुवनेश्वरने शुन्यावर जोस बटलरची बाद केले. पांड्याने एकाच षटकात लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेसन रॉय यांना बाद करत इंग्लंडला जोरदार धक्का दिला. नवोदित अर्शदीप सिंगने जेसन रॉय बाद केले.

मोईन अलीने 20 चेंडूत 36 धावा आणि हॅरी ब्रूकच्या (23 चेंडूत 28) थोडा वेळ प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण या जोडीने युझवेंद्र चहलची बाद करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. भारत या मैदानावर खराब क्षेत्ररक्षण केले. कारण त्यांनी तब्बल पाच झेल सोडले. त्यानंतर इंग्लंडचा डाव 19.3 षटकांत 148 धावांत आटोपला.

तपुर्वी, भारत आणि इंग्लंड (India VS England) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पंड्याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडपुढे 199 धावांचे आव्हान ठेवले. हार्दिकने 33 चेंडूंत 51 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली, ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. (India VS England)

साउथॅम्टनच्या मैदानावर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. स्वत: रोहितने त्याच्या नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात केली; पण तिसर्‍या षटकात मोईन अलीने त्याची विकेट घेतली. 14 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने तो 24 धावा करून बाद झाला. रोहितने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त कर्णधार म्हणून 1000 धावांचा टप्पा ओलांडला.

कर्णधार म्हणून भारतासाठी ट्वेंटी-20त विराट कोहलीने 1570 धावा, महेंद्रसिंग धोनीने 1112 धावा आणि रोहितने 1011 धावा केल्या आहेत. दीपक हुडा फलंदाजीला आला अन् त्यानेही खणखणीत षटकार खेचले. मोईन अलीच्या पुढच्या षटकात दीपकने पुढे येऊन दोन सणसणीत षटकार मारले; पण अलीने ईशानला चकवले. ईशान किशन (8) स्वीप शॉट मारण्याच्या प्रयत्नात माघारी परतला.

दीपकसोबत सूर्यकुमार यादवने तिसर्‍या विकेटसाठी 23 चेंडूंत 43 धावांची भागीदारी केली. ख्रिस जॉर्डनने 9व्या षटकात ही जोडी तोडली. दीपक 17 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार मारून 33 धावांवर झेलबाद झाला. हार्दिक पंड्यानेही सुरेख फटके मारले. त्याने सूर्यकुमारसह 18 धावांत 37 धावा झोडल्या. पुन्हा एकदा जॉर्डनने विकेट मिळवून दिली. त्याच्या बाऊन्सरवर सूर्यकुमार यादव 39 धावांवर (19 चेंडू, 4 चौकार व 2 षटकार) झेलबाद झाला. (India VS England)

हार्दिकला 37 धावांवर बटलरने यष्टीमागून जीवदान दिले. त्याने स्टम्पिंगची सोपी संधी गमावली. हार्दिक व अक्षर पटेल यांनी 30 चेंडूंत 45 धावांची भागीदारी केली. अक्षर 17 धावांवर पर्किन्सनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अखेरचे 20 चेंडू खेळण्यासाठी दिनेश कार्तिक मैदानावर आल्याने चाहते खूश झाले. हार्दिकने 30 चेंडूंत ट्वेंटी-20तील पहिले अर्धशतक झळकावले. हार्दिक 33 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 51 धावांवर माघारी परतला. कार्तिकने 20व्या षटकात सलग दोन चौकार खेचले; परंतु टायमल मिल्सने पुढच्या चेंडूवर त्याची विकेट घेतली. सॅम कुरनने परतीचा अप्रतिम झेल टिपला. भारताने 8 बाद 198 धावांपर्यंत मजल मारली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT