Latest

India vs Bharat row | १९ वर्षांपूर्वी ‘इंडिया’च्या नामांतराचा प्रस्ताव कोणी मांडला होता?

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी जी २० साठीच्या मेजवानी समारंभाच्या निमंत्रणपत्रावर रिपब्लिक ऑफ इंडिया या परंपरागत पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या शब्दाऐवजी रिपब्लिक ऑफ भारत असा उल्लेख केल्यामुळे वादाचे नवे मोहोळ उठले आहे. देशाचे नाव बदलण्याच्या अफवांना जोर आला असून संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनामध्ये यासाठीचे विधेयक सरकारतर्फे आणले जाऊ शकते. भाजपने या संभाव्य बदलाचे स्वागत केले आहे, तर विरोधकांनी यावरून रान उठवले आहे. मात्र देशाचे नाव बदलण्याचा ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही एकदा असाच प्रयत्न झाला आहे. (India vs Bharat row)

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांनी १९ वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना विधानसभेत भारताचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आणला होता. त्यावेळी मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत इंडियाचे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव आणला आणि तो एकमताने मंजूर करून घेतला होता.

भारतीय राज्यघटनेच्या भाग १ च्या कलम १ (केंद्राचे नाव आणि प्रदेश) मधील 'इंडिया दॅट इज भारत'च्या जागी 'भारत दॅट इज इंडिया' याऐवजी राज्यघटनेत आवश्यक दुरुस्त्या करण्याचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव सभागृहाच्या कामकाजात म्हणाले होते की, राज्यघटनेत 'इंडिया इज भारत' लिहिलेले असेल तेथे 'भारत इज इंडिया' असे लिहिले पाहिजे. (India vs Bharat row)

उत्तर प्रदेश विधानसभेत झाला होता प्रस्ताव मंजूर

२००४ मध्ये झालेल्या निवडणुकांदरम्यान समाजवादी पक्षानेही आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात देशाचे नाव बदलून इंडियाचे भारत करण्याचे नमूद केले होते. त्यासाठी निवडणूक जाहीरनाम्यात देशाचे नाव बदलण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची चर्चा होती. जे सरकार स्थापनेनंतर ३ ऑगस्ट २००४ रोजी मुलायम सिंह यांनी विधानसभेत मांडले होते. सभागृहात मांडण्यात आल्यानंतर देशाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता.

या प्रस्तावांतर्गत समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायमसिंह यादव यांनी केंद्र सरकारकडे राज्यघटनेच्या भाग १ मधील कलम १ मध्ये सुधारणा करून 'इंडिया दॅट इज भारत' ऐवजी 'भारत दॅट इज इडिया' असा प्रस्ताव पाठवला होता. समाजवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणतात की मुलायम सिंह हे नेहमीच एक देश, एक नावाच्या बाजूने राहिले आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT