Latest

World Cup 2023 Final : हायहोल्टेज सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज; हॉटेल रूमचे भाडे ऐकून आवाक व्हाल

मोहन कारंडे

अहमदाबाद; वृत्तसंस्था : वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना रविवारी (१९ नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना पाहण्यासाठी केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातून क्रिकेट चाहते अहमदाबादला पोहोचत आहेत. त्यामुळे तेथील सर्वच सेवांचे दर गगनाला भिडले असून हॉटेल भाडे तर सव्वा लाखावर पोहोचले आहे. (World Cup 2023 Final )

संबंधित बातम्या : 

वर्ल्ड कप फायनलमुळे हॉटेलच्या भाड्यात वाढ झाल्याबद्दल फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ गुजरातचे अध्यक्ष नरेंद्र सोमाणी म्हणाले, भारत अंतिम फेरीत पोहोचला आहे त्याचा उत्साह देशभर पाहायला मिळतो आहे. दुबई, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील लोक येथे येऊन सामना पाहण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे ज्या खोल्यांची किंमत २० हजार रुपये होती ती आता ५० हजार रुपये ते १ लाख २५ हजार रुपये झाली आहे. (World Cup 2023 Final )

२० वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भिडणार आहेत. भारतीय संघाने १९८३, २००३, २०११ नंतर चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर कांगारू संघ १९७५, १९८७, १९९६, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ नंतर आठव्यांदा विजेतेपदाचा सामना खेळणार आहे. २० वर्षांपूर्वी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया रविवारी (१९ नोव्हेंबर) मैदानात उतरणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT