Latest

IND vs AUS T20 Series : टीम इंडिया पुन्हा ऑस्ट्रेलियाला भिडणार! 2 दिवसांनी पुन्हा…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS T20 Series : वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. मात्र हे दोन्ही संघ 2 दिवसांनी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. उभय संघांचे लक्ष्य आता पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेवर असणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिकेचे वेळापत्रक (IND vs AUS T20 Series)

टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी अर्थात 2024 मध्ये खेळवली जाणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेची तयारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेपासून सुरू करेल. ही मालिका 23 नोव्हेंबरपासून भारतात खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. दुसरा सामना 26 नोव्हेंबरला त्रिवेंद्रममध्ये तर तिसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाईल. यानंतर चौथा टी-20 सामना 1 डिसेंबरला नागपुरात तर मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल.

भारतीय संघात युवा खेळाडूंना मिळणार संधी?

2023 च्या वनडे विश्वचषकाचा भाग असलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. हार्दिक पंड्याही दुखापतीशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया या मालिकेत नव्या कर्णधारासह मैदानात उतरू शकते. या संघात एशियन गेम्समध्ये चांगली कामगिरी केलेल्या यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने या मालिकेसाठी आधीच आपला संघ जाहीर केला आहे. (IND vs AUS T20 Series)

टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ :

मॅथ्यू वेड (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा, तन्वीर संघा.

SCROLL FOR NEXT