Latest

Military Expenditure : लष्‍करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : 2021 मध्ये US$ 2.1 अमेरीकन ट्रिलियन डॉलर इतका जागतिक लष्करी खर्च करण्यात आला आहे. लष्‍करावर सर्वाधिक खर्च करणार्‍या देशांमध्‍ये अमेरिका आणि चीन हे अनुक्रमे पहिल्‍या व दुसर्‍या स्‍थानी असून,   भारत तिसर्‍या स्‍थानावर आहे, असे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (SIPRI) म्‍हटलं आहे.

भारताने २०२१ मध्‍ये आपल्या लष्करावर 76.6 बिलियन अमेरिकन डॉलर इतका खर्च केला आहे. सर्वाधिक संरक्षण खर्च करणाऱ्या यादीत भारत हा जगात तिसऱ्यास्थानी आहे. 2021 मध्ये एकूण जागतिक लष्करी खर्च 0.7 टक्क्यांनी वाढला असून, 2113 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचला आहे. 2021 मध्ये लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशामध्ये अमेरिका, चीन, भारत, युनायटेड किंगडम आणि रशिया या पाच देशांचा 62 टक्के इतका वाटा असल्‍याचे त्‍०यांनी म्‍हटलंे

SIPRI च्या लष्कर खर्च आणि शस्त्रास्त्र उत्पादन कार्यक्रमाचे वरिष्ठ संशोधक डॉ डिएगो लोप्स डा सिल्वा म्हणाले की, कोरोना महामारीच्या आर्थिक परिणामानंतरही जगभरात लष्करावर केला जाणारा खर्च हा विक्रमी पातळीवर आहे. पुढे ते म्हणाले की, मात्र सध्या चलनवाढीमुळे वास्तविक वाढ मंदावली आहे. एकूण लष्करी खर्चात 6.1 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कोविड-19 नंतर आणि आर्थिक सुधारणेनंतरही 2020 मध्ये संरक्षण खर्च जागतिक GDP च्या 2.2 टक्के इतका होता.

2021 मध्ये भारताचा लष्करी खर्च  76.6 बिलियन डॉलर्स इतका असून भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. जो 2020 च्या तुलनेत 0.9 टक्क्यांनी वाढला आहे. संस्थेच्या मते, भारत 76.6 अब्ज डॉलर लष्करी खर्च करत, जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे 2020 च्या तुलनेत 0.9 टक्के जास्त आणि 2012 च्या तुलनेत 33 टक्के जास्त आहे. ब्रिटनने गेल्या वर्षी संरक्षणावर 68.4 अब्ज खर्च केले होता, जो 2020 च्या तुलनेत तीन टक्के जास्त आहे.

अमेरिकेचा लष्करी खर्च 801 अब्ज डॉलर्सवर पोहोचला असून, जो 2020 च्या तुलनेत 1.4 टक्के कमी आहे. 2012 ते 2021 या कालावधीत अमेरिकेने लष्करी संशोधन आणि विकासासाठी 24 टक्क्यांनी निधी वाढवला आहे. तर शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर होणारा खर्च 6.4 टक्क्यांनी कमी केला आहे. आपण दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनबद्दल बोललो तर त्याने लष्करावर 293 अब्ज खर्च केले आहेत. चीनच्या खर्चात 2020 च्या तुलनेत 4.7 टक्के वाढ झाली आहे.

रशिया हा लष्करी खर्चात पाचव्या क्रमांकावर आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, रशियाने 2021 मध्ये आपला लष्करी खर्च 2.9 टक्क्यांनी वाढवून 65.9 डॉलर अब्ज इतका केला आहे. हे सलग तिसऱ्या वर्षी झाले आहे की, रशियाचा संरक्षण खर्च 4.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. निवेदनात म्हटले आहे की, 2021 मध्ये, ऊर्जेच्या उच्च किंमतीमुळे रशियाचा लष्करी खर्च वाढण्यास मदत झाली आहे. SIPRI च्या लष्करी खर्च आणि शस्त्रास्त्र उत्पादन कार्यक्रमाचे संचालक लुसी बेरोड-सुद्रू यांनी सांगितले की, रशियाने 2016-2019 दरम्यान लष्करी खर्च कमी केला आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT