Latest

Asian Games 2023 : हॉकीमध्ये भारतीय संघाची ‘गोल्डन फायनल’मध्ये धडक! उपांत्य सामन्यात द. कोरियाला चारली धुळ

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी झाला. या सामन्यात भारताने कोरियाविरुद्ध 5-3 फरकाने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने ९ वर्षानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. (India vs South Korea Hockey)

भारत नऊ वर्षांनंतर अंतिम फेरीत

२०१४ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. २०१८ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पराभव झाला होता. यानंतर ९ वर्षांनी उपांत्य फेरीत कोरियाच परभव करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना चीन आणि जपान यांच्यातील विजेत्या संघासोबत होणार आहे. हा सामना ६ ऑक्टोबरला होणार आहे.

भारताने केले असे गोल

पहिला गोल : सामन्याच्या पाचव्या मिनिटाला भारतीय संघाने गोलचे खाते उघडले. भारतीय खेळाडूने मारलेला फटका कोरियाच्या गोलकीपरने उत्कृष्टरित्या अडवला. या बचावाच्या रिबाउंवर भारताच्या हार्दिक सिंगने कोणतीही चुक न करता गोल डागला. (India vs South Korea Hockey)

दुसरा गोल : भारताने ११व्या मिनिटाला दुसरा गोल केला. गुरजंतने चेंडू हाताळत गोलपोस्टजवळ असलेल्या मनदीप सिंगकडे पास केला. मनदीपने कोणतीही चूक न करता गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

तिसरा गोल : सामन्याच्या १५ व्या मिनिटाला भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीतने दिलेल्या पासवर ललितने गोल केला. या गोलमुळे भारतीय संघाने कोरोयावर ३-० अशी आघाडी घेतली आहे.

चौथा गोल : सामन्यात भारतीय खेळाडूला रोखण्याच्या प्रयत्नात कोरियाच्या खेळाडूने फाऊल केला. यामुळे पंचांनी भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर बहाल केला. भारताचा कर्णधार हरमीनप्रीतच्या अनुपस्थितीत अमित रोहिदासने किक घेत अप्रतिम गोलची नोंद केली.

कोरियाने केले असे गोल

कोरियाची पहिला गोल : कोरियाने सामन्याच्या १७ व्या मिनिटाला गोलचे खाते उघडले. पेनल्टी कॉर्नरवर कोरियाचा जंग मांजेने संघासाठी पहिला गोल केला.

कोरियाचा दुसरा गोल : सामन्याच्या २० व्या मिनिटाला कोरियाचा दिग्गज खेळाडू जंग माजे याने वैयक्तिक आणि संघासाठी दुसरा गोल नोंदवला.

कोरियाचा तिसरा गोल : सामन्यातील तिसऱ्या क्वार्टरच्या अंतिम क्षणी कोरियाने तिसरा गोल नोंदवला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT