Latest

Independence Day : ‘मंगल पांडे’पासून ‘लक्ष्य’पर्यंत ‘हे’ देशभक्तीपर ९ चित्रपट पाहिले का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात आज ७७ वा स्वांतत्र्यदिन साजरा केला जात आहे. सगळीकडे उत्साह दिसत आहे. (Independence Day ) स्वातंत्र्याचं नवं रूप लोकापर्यंत पोहोचवण्‍यासाठी बॉलिवूडचेही योगदानही महत्त्‍वाचे आहे. बॉलिवूडमध्‍ये स्‍वातंत्र्य लढा आणि देशभक्‍तीवर आधारित चित्रपट आले. या नऊ चित्रपटांबद्‍दल जाणून घेऊया. (Independence Day)

मंगल पांडे : द रायजिंग

२००५ मध्‍ये हा चित्रपट आला होता. क्रांतिकारी मंगल पांडे यांच्‍या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा होती. अभिनेता आमिर खानची मुख्‍य भूमिका होती.

लक्ष्य

२००४ आलेला चित्रपट 'लक्ष्य' एक वेगळी कहाणी दर्शवतो. फरहान अख्तरच्‍या दिग्‍दर्शनाखाली बनलेल्‍या या चित्रपटात ऋतिक रोशनसोबत प्रीति जिंटा, अमिताभ बच्चन, ओम पुरी आणि बोमन ईरानी यासारख्‍या स्टार्सच्‍या भूमिका होत्‍या. या चित्रपटात ऋतिकने लेफ्टनंट करण शेरगिलची भूमिका केली होती. या चित्रपटाची कहाणी १९९९ च्‍या कारगील युद्धावर आधारित एक काल्पनिक होती.

आनंद मठ

गोल्डन इरा आणि १९५२ मध्‍ये आलेला चित्रपट 'आनंद मठ' बंकिम चंद्र चॅटर्जी यांच्‍या कादंबरीवर आधारित होता. ही कथा क्रांतिकारकांच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या संघर्षाची होती. चित्रपटात बंकिंम चंद्र लिखित गाणेही दाखवण्‍यात आले होते.

हकीकत

हा चित्रपट १९६४ मध्‍ये आला होता. ही कहाणी एका सैन्‍याच्‍या तुकडीवर आधारित होती. हे सैनिक लडाखमध्‍ये भारत-चीन युद्धाच्‍या दरम्‍यान, विचार करतात की, आता आपला मृत्‍यू निश्चित आहे. आणि त्‍यातील काही सैनिक कॅप्टन बहादूर सिंह यांना वाचवण्‍यात यशस्‍वी होतात. हा चित्रपट प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरला होता.

शहीद (१९६५)

एस. राम शर्मा दिग्‍दर्शित या चित्रपटात मनोज कुमार यांनी सरदार भगतसिंग यांची भूमिका केली होती. याशिवाय, या चित्रपटात कामनी कौशल, प्राण, प्रेम चोप्रा, निरुपा रॉय आणि मदन पुरी देखील होते. या चित्रपटातील गाणी स्वातंत्र्य सेनानी राम प्रसाद बिस्मिल यांनी लिहिले होते. १३ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार पटकावला होता. या चित्रपटानंतर त्यांनी 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यासारखे चित्रपटही केले.

उपकार

देशभक्तीवर आधारित 'उपकार' हा चित्रपट १९६७ रोजी रिलीज झाला होता. मनोज कुमार आणि प्रेम चोप्रा यांच्‍या भूमिका होत्या.

गांधी

महात्मा गांधी यांच्‍या आयुष्‍यावर आधारित 'गांधी' हा चित्रपट १९८२ मध्‍ये आला होता. हा चित्रपट रिचर्ड एटनबरोघ यांनी दिग्दर्शित केला होता. यात बेन किंग्सले यांनी गांधी यांची भूमिका केली होती. चित्रपटाने अनेक पुरस्‍कार आपल्‍या नावे केले होते.

बॉर्डर

या चित्रपटाबरोबर या चित्रपटातील गाणीही हिट झाली होती. बॉर्डर १९७१ च्‍या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित होती. या चित्रपटात अनेक स्टार्स होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

द लेजेंड ऑफ भगतसिंग (२००२)

२००२ मध्‍ये सरदार भगतसिंग यांच्‍या जीवनावर राजकुमार संतोषी यांनी बनवलेल्‍या चित्रपटात भगतसिंग यांची व्‍यक्‍तिरेखा अभिनेता अजय देवगनने साकारली होती. अजयच्‍या या भूमिकेचे कौतुकही झाले होते. याचशिवाय, चित्रपटातील गाणीही प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटात अजयसोबत सुशांत सिंह, अखिलेंद्र मिश्रा, राज बब्बर, फरीदा जलाल यांच्‍या भूमिका होत्‍या. पियूष मिश्रा यांनी चित्रपटाचे डायलॉग्‍ज लिहिले होते. या चित्रपटामध्ये इंग्रजांना लढा देण्यासाठी भगतसिंग यांनी लढलेला थरारक प्रवास याचं चित्रण करण्यात आलं होतं. या चित्रपटाला २ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्म म्हणून फिल्मफेअर अॅवॉर्डही मिळाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT