Latest

Team India Openers : रोहितसोबत सलामीला येण्यास ‘या’ तीन युवा फलंदाजांमध्ये चुरस!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Openers : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला 27 जुलै पासून सुरू होणार आहे (India vs West Indies ODI Series). भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप आहे. कॅरेबियन संघ यापूर्वीच 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातून (ODI World Cup) बाहेर पडला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या (Team India) तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असेल. आयपीएल (IPL) आणि देशांतर्गत मालिकांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान मिळाले असून रोहित शर्मा सोबत ओपनिंगला येण्यासाठी तीन खेळाडूंमध्ये मोठी चुरस आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कर्णधारासोबत कोण ओपनिंगला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

1. शुभमन गिल (Shubman Gill)

शिखर धवन संघातून बाहेर पडल्यानंतर शुभमन गिलने तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही काळापासून तो कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला येत ​​आहे. तो आपल्या फलंदाजीने छाप पाडण्यात यशस्वी ठरला असून त्याने भारतासाठी आतापर्यंत 20 सामन्यांमध्ये 1132 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध सलामीला येताना त्याने द्विशतकही ठोकले होते. आता तो विंडिजविरुद्ध पहिल्या वनडेत सलामी येऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. (Team India Openers)

2. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)

ऋतुराज गायकवाडचाही भारतीय कसोटी संघात समावेश होता, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळू शकली नाही. त्याला वनडे संघातही स्थान मिळाले आहे. यापूर्वीही त्याची वनडे संघात निवड झाली आहे. पण त्याला पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत एक वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2023 मध्ये चमकदार फलंदाजी करून चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठ्या खेळी साकारल्या. ज्यामुळे सीएसकेला आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावण्यात यश आले. गायकवाडने आयपीएलच्या 16 सामन्यांत 4 अर्धशतकांसह 590 धावा केल्या. (Team India Openers)

3. इशान किशन (Ishan Kishan)

इशान किशनला विंडीज मालिकेसाठी यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळाले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरच त्याने भारताकडून कसोटी पदार्पण केले. विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने 33 चेंडूत 50 धावा केल्या. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामी दिली आहे. ज्यात त्याने 341 धावा जमा केल्या असून यात एका द्विशतकाचा समावेश आहे. (Team India Openers)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT