Latest

Team India ची प्लेइंग 11 बदलणार? सलग दोन विजयानंतरही…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India IND vs WI : भारतीय क्रिकेट संघाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला. यासह मालिका 2-2 अशी बरोबरीत पोहोचली आहे. आता मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. हा निर्णायक सामना आज (दि. 13) रविवारी खेळवण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन कोणत्या खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी देते हे पाहणे विशेष ठरणार आहे.

गिल-जैस्वाल देतील सलामी (Team India IND vs WI)

शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल 5व्या टी-20 मध्ये पुन्हा एकदा डावाची सुरुवात करतील. गिल (77) आणि जैस्वाल (84*) या जोडीने चौथ्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. अशा स्थितीत ईशान किशनचे संघात पुनरागमन होणे फार कठीण वाटत आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर उतरेल.

'हे' खेळाडू उतरतील मधल्या फळीत

तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर उतरतील. या संपूर्ण मालिकेत टिळकांनी अप्रतिम फलंदाजी केली आहे. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसनचा क्रमांक लागतो. सॅमसन संघाचा यष्टिरक्षकही आहे. त्याचबरोबर संघाकडे अक्षर पटेलच्या रूपाने फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडूही आहे. (Team India IND vs WI)

'या' 4 गोलंदाजांना मिळेल संधी (Team India IND vs WI)

पाचव्या सामन्यात पुन्हा एकदा युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही फिरकी जोडी मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार हे संघाचे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज असतील. ज्या खेळाडूंसोबत टीम इंडियाने गेल्या दोन सामन्यात विजय मिळवला ते शेवटच्या सामन्यातही दिसतील आणि प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.

पाचव्या टी-20 साठी संभाव्य प्लेइंग 11 : (Team India IND vs WI)

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

SCROLL FOR NEXT