ODI CRICKET : वन-डे मधील सर्वात हिट सलामी जोड्या | पुढारी

ODI CRICKET : वन-डे मधील सर्वात हिट सलामी जोड्या

वन डे क्रिकेटचे प्रारूप 1971 पासून खेळले जात आहे. 50 वर्षांपासून खेळल्या जाणार्‍या या प्रकारात आजपर्यंत हजारो खेळाडू खेळले आहेत. यापैकी सलामीला हिट झालेल्या जोड्यांपैकी काही जोड्यांची माहिती घेऊ…ज्याचा पाया भक्कम असतो, ती इमारत मजबूत बनते. क्रिकेटमध्येही असेच आहे. धावसंख्येचा पाया जितका जास्त तितका धावांचा डोंगर मोठा. हा पाया रचण्याची जबाबदारी सलामीवीरांवर असते. डावाच्या सुरुवातीला गोलंदाज ताजेतवाने असतात, चेंडू नवा असल्यामुळे गोलंदाजांना स्विंग मिळतो. काही वेळा खेळपट्टीचा अंदाज नसतो, अशा परिस्थितीत सलामीवीर खंबीरपणे उभे राहात डावाची भक्कम पायाभरणी करतात.

सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली

सचिन तेंडुलकर आणि सौरवक गांगुली ही वन डे इतिहासातील सर्वात यशस्वी जोडी म्हणून गणली जाते. 1996 ते 2007 या 11 वर्षांच्या काळात दोघांनी 136 वेळा भारतासाठी डावाची सुरुवात केली. दोघांनी 49.32 च्या सरासरीने 6609 धावा केल्या. दोघांमध्ये 21 वेळा शतकी भागीदारी झाली तर 23 वेळा अर्धशतकी सलामी दिली. (ODI CRICKET)

अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन (ODI CRICKET)

हेडन आणि गिलख्रिस्ट ही तत्कालिन वन डे क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक जोडी मानली जाते. ऑस्ट्रेलियासाठी या जोडीने 2001 ते 2017 या काळात 48 च्या सरासरीने 5371 धावा केल्या. यांच्यातील सर्वोच्च भागीदारी 172 धावांची आहे. 2003 आणि 2007 चा मध्ये ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. (ODI CRICKET)

गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स

वेस्ट इंडिजच्या सुवर्णकाळातील गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स हे दोन हिरे आहेत. जगातील टॉप दहा सलामीवीरांपैकी फक्त या दोघांची सरासरी 50 च्या वर आहे. दोघांनी 102 डावांत 52.55 च्या सरासरीने 5150 धावा केल्या आहेत. निवृत्ती घेताना हेन्स हा त्या काळचा सर्वात जास्त धावा (8648) असलेला खेळाडू होता.

रोहित शर्मा आणि शिखर धवन (ODI CRICKET)

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जोडी आता तुटली आहे. खराब फॉर्ममुळे धवन आता टीम इंडियातून बाहेर आहे. रोहित आणि धवन यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा भारताला एकत्र सलामी दिली. दोघांनी 115 सामन्यांत 45.55 च्या सरासरीने 5148 धावा जोडल्या आहेत. दोघांनी 18 वेळा शतकी सलामी दिली आहे. (ODI CRICKET)

हाशिम आमला आणि क्विंटन डिकॉक (ODI CRICKET)

दक्षिण आफ्रिकेची हाशिम आमला आणि क्विंटन डिकॉक ही जोडी कमालीची होती. दोघांनी 93 वेळा दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. त्यांनी 46.64 च्या सरासरीने 4198 धावा संघाला जोडून दिल्या. 2019 मध्ये आमलाच्या निवृत्तीनंतर ही जोडी तुटली. डिकॉक मात्र अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे. (ODI CRICKET)

Back to top button