Latest

IND vs NZ : ‘भारताचाही पराभव करु’, न्यूझीलंडच्या कर्णधाराचे टीम इंडियाला आव्हान

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या विश्वचषकात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. दुबळ्या अफगाणिस्तानने इंग्लंडला नमवत इतिहास रचला. दरम्यान, इंग्लंडचा पराभव करणाऱ्या अफगाणिस्तानने न्यूझीलंडसमोर अक्षरश: नांगी टाकली. अफगाणिस्तानचा पराभव करत न्यूझीलंडने विश्वचषकातील चौथा विजय मिळवला. चौथा विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमने मोठे वक्तव्य केले आहे. या वेळी बोलताना त्याने टीम इंडियाबाबत मोठे विधान केले आहे. "आम्ही भारत आणि ऑस्ट्रेलियालाही पराभव करु आणि विजयाचा ट्रेंड कायम ठेऊ", असे टॉम लेथम म्हणाला आहे.(IND vs NZ)

केएन विल्यमसनला दुखापत झाल्यामुळे न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी टॉम लेथमकडे देण्यात आली होती. टॉम लेथमच्या नेतृत्वात न्यूझीलंडच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर टॉम लेथम म्हणाला, "आम्ही विश्वचषकात आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आमच्याकडे आता पुढील सामना खेळण्यासाठी एका आठवड्याचा वेळ आहे. त्यानंतर आमचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आम्ही भारत आणि ऑस्ट्रेलियालाही पराभव करु आणि विजयाचा ट्रेंड कायम ठेऊ" (IND vs NZ)

न्यूझीलंडचा विजयी चौकार

ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम व विल यंगच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंड संघाने आयसीसी क्रिकेट वन डे विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा 149 धावांचा फडशा पाडला आणि साखळी फेरीत विजयाचा चौकार नोंदवला.  न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 50 षटकात 6 बाद 288 धावा केल्या तर प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा डाव 34.4 षटकात अवघ्या 139 धावांमध्येच खुर्दा झाला. मिशेल सॅन्टनर व लॉकी फर्‍ग्युसन यांनी प्रत्येकी 3 बळी घेत अफगाणच्या डावाला खिंडार पाडले आणि यातून हा संघ शेवटपर्यंत सावरु शकला नाही. (IND vs NZ)

विजयासाठी 289 धावांचे आव्हान असताना अफगाणतर्फे रहमत शाहने सर्वाधिक 36 तर अझमतुल्लाहने 27 धावा केल्या. इतका अपवाद वगळता बहुतांशी अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. किवीज संघातर्फे सॅन्टनरने 39 धावात 3 तर फर्‍ग्युसनने 19 धावात 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय, ट्रेंट बोल्टने 18 धावात 2 व हेन्री, रविंद्र यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या सामन्यात सॅन्टनरने नबीचा एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवत कारकिर्दीतील 100 वन डे बळींचा टप्पा सर केला. (IND vs NZ)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT