Latest

IND vs NZ 1st T20 : भारतीय संघात होणार मोठे बदल, जाणून घ्‍या कोणाला मिळणार संधी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे मालिकेत भारताने ३-० ने एकतर्फी विजय मिळवला. वनडे मालिकेत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर भारताचे लक्ष आता टी-20 मालिकेवर असणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा असणार आहे. (IND vs NZ 1st T20)

IND vs NZ 1st T20 : पृथ्वी शॉला मिळणार संधी?

भारत वि. न्यूझीलंड टी-20 मालिकेतील पहिला सामना २७ जानेवारीला रांचीमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल. दरम्यान, या मालिकेसाठी पृथ्वी शॉला संधी मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉने मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्यामुळे पृथ्वी शॉला संधी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. कारण पृथ्वी शॉने काही दिवसांपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावले होते. (IND vs NZ 1st T20)

टीम इंडियाचे लक्ष ऑक्‍टोबर २०२३ पासून सुरु होणार्‍या वन-डे विश्वचषकावर आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन युवा खेळाडूंना संधी देताना पाहायला मिळत आहे. टी-20 मालिकेसाठी अशा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, ज्यांना पुढील वर्षीच्या टी-20 विश्वचषकात संधी मिळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. (IND vs NZ 1st T20)

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत इशान किशन आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजी करु शकतात. राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तर सूर्यकुमार यादवला चौथ्या स्थानावर आणि हार्दिक पंड्याला पाचव्या स्थानावर संधी मिळू शकते. शिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुड्डालाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा टी-20 सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. मागील काही वर्ष न्‍यूझीलंड आणि भारत यांच्‍यातील क्रिकेट सामन्‍यांमध्‍ये चुरस पाहण्‍यास मिळत आहे.  गेल्‍या काही वर्षांमध्‍ये आयसीसीच्‍या प्रमुख स्‍पर्धांमध्‍ये भारताला न्‍यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्‍ये २०१९ वन-डे विश्‍वचषक, २०२१ टी-२० साखळी सामने आणि कसोटी विश्‍वचषक अंतिम सामन्‍यात न्‍यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव करत टीम इंडियाला स्‍पर्धेतूनच बाद केले होते. त्‍यामुळे नुकत्‍याच झालेल्‍या वन-डे मालिका ३-० जिंकत न्‍यूझीलंडला क्‍लीनस्‍वीप दिले होते. असेअसले तरी टी-२० मालिकेत न्‍यूझीलंडचा संघ कमबॅक करु शकतो. त्‍यामुळे या मालिकेतील सामने प्रेक्षणीय होतील, असे मानले जात आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संभाव्य भारतीय संघ (IND vs NZ 1st T20) : शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, अर्शदीप सिंग, उमरान मलिक , युजवेंद्र चहल

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT