Latest

IND vs ENG | कसोटी मालिकेतील विराटच्या अनुपस्थितीवर इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसेन म्हणाले…

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील आगामी दोन कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीची अनुपस्थिती भारतासाठी मोठे नुकसान ठरेल, असे मत इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसेन यांनी व्यक्त केले. वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकल्यानंतर विराट आता राजकोट आणि रांची येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याच्या वृत्तादरम्यान त्यांनी आपले मत मांडले आहे. (IND vs ENG)

खासगी कारणांमुळे सध्या विराट पत्नी अनुष्का शर्मासोबत आहे. 15 वर्षांहून अधिक काळ सतत क्रिकेट खेळणाऱ्या विराट कोहलीला वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देण्यासाठी नासेर हुसैन यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, त्यांनी भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलला संघातील पुनरागमनासाठी आणि कोहलीच्या अनुपस्थितीत संघासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

इंग्लंडविरूद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. हैदराबादमध्ये येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा 28 धावांनी पराभव केला, तर विशाखापट्टणम येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. (IND vs ENG)

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना नासिर म्हणाले, मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यातून विराटने माघार घेतल्याने हा भारतीय संघासाठी झटका असल्याचे सांगितले. इंग्लंड-भारत यांच्यातील मालिका जशी पुढे जाईल तशी ती रोमांचकारी होईल असे सांगितले. विराट कोहली सध्या किक्रेटच्या सर्व प्रकारांमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. आणि असा खेळाडूची कमतरता भारताला नक्कीच भासेल असे त्यांनी सांगितले.

पुढे नासिर म्हणाले, "कोहली आणि त्याचे कुटुंब आणि त्याचे वैयक्तिक आयुष्य प्रथम येते, त्यामुळे भारतासाठी हा एक धक्का आहे, परंतु जसे आपण पाहिले आहे की त्यांच्याकडे खूप चांगले युवा फलंदाज आहेत. परंतु केएल राहुलने भारतासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. गेले काही महिने. त्याने ऑस्ट्रेलियासाठी सर्व फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मला वाटते की तो संघात परत येईल आणि फलंदाजी युनिट मजबूत करेल."

विराटसाठी त्यांचे कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य पहिले येते. विराटच्या अनुपस्थितीत केएल राहुलने फलंदाजी चांगली कामगिरी केली आहे. राहुलने काही काळापासून किकेटच्या सर्व प्रकारत चांगली फलंदाजी केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT