Latest

IND vs ENG : पराभव लागला जिव्‍हारी! इंग्‍लंडच्‍या कर्णधार म्‍हणतो, “ते तीन निर्णय…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :इंग्‍लंड विरुद्धच्‍या कसोटी मालिकेतील तिसर्‍या सामन्‍यात रविवारी (१८ फेब्रुवारी) भारतानेमोठा विजय नोंदवला. तर इंग्लंडचा कसोटीतील धावांच्या फरकाने हा दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला. यामुळेच इंग्‍लंडचा कर्णधार बेन स्‍टोक्‍स याला हा पराभव पचनी पडलेला नाही. आमच्‍या संघाविरुद्ध काही चुकीचे निर्णय घेण्यात आले, असा दावा त्‍याने केला आहे. तसेच डीआरएस प्रणालीतील 'अंपायर कॉल' हा नियम  बंद केला पाहिजे, असेही मत त्‍याने व्‍यक्‍त केले आहे. (Ben Stokes questions DRS and umpires call )

Ben Stokes questions DRS : काय म्‍हणाला बेन स्‍टोक्‍स ?

एका मुलाखतीदरम्यान दुसऱ्या डावात जॅक क्रॉलीला एलबीडब्ल्यू ( पायचीत ) आऊट झाल्याचे उदाहरण देत इंग्‍लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्‍हणाला की, "आम्हाला जॅकच्या 'डीआरएस' ( डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम) बद्दल काही स्पष्टता हवी होती. रिप्लेमध्ये चेंडू स्पष्टपणे स्टंपला चुकला. त्यामुळे जेव्हा अंपायरचा कॉल देण्यात आला आणि चेंडू प्रत्यक्षात स्टंपला लागला नाही तेव्हा आम्हाला थोडे आश्चर्य वाटले.आम्हाला काही स्पष्टता हवी होती. यावर आम्‍हाला उत्तर मिळाले  की, चेंडू स्टंपला लागला होता; पण प्रक्षेपण चुकीचे होते. याचा अर्थ काय ते मला माहित नाही, परंतु काहीतरी नक्कीच चुकले आहे." (Ben Stokes questions DRS and umpires call )

'अंपायर कॉल' नियम बदलला पाहिजे

या वेळी स्टोक्स म्हणाला, 'डीआरएस' प्रणालीचे काही भाग बदलणे आवश्यक आहे. 'अंपायर कॉल'चा नियम आधी बदलला जावा, राजकोट कसोटी सामन्यात पंचांचे तीन निर्णय आमच्या विरोधात गेले. हा DRS चा भाग आहे. तुम्ही एकतर बरोबर आहात किंवा चुकीचे आहात. दुर्दैवाने चूक आमच्या विरुद्ध झाली. आम्ही हा सामना गमावण्याचे एकमेव कारण डीआरएसचे निर्णय हाेते, असे आम्‍ही म्‍हणत नाही. कारण 500 धावांचे लक्ष्‍यही तेवढेच महत्त्‍वपूर्ण होते.

पंचांचे काम खरोखरच कठीण असते. विशेषत: भारतीय खेळपट्‍टीवर जेव्हा चेंडू फिरत असतो, तेव्हा त्यांना निर्णय घेणे अधिक कठीण होते. माझे वैयक्तिक मत असे आहे की, जर चेंडू स्टंपला आदळत असेल तर तो स्टंपला आदळत आहे. जर मी पूर्णपणे प्रामाणिक असेल तर त्यांनी 'अंपायर कॉल' काढून टाकला पाहिजे, असेही स्टोक्स म्‍हणाला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT