Latest

Black Tomatoes : ‘या’ आजारावर गुणकारी काळ्या टोमॅटोंची वाढली मागणी

Arun Patil

लंडन : काळा कोबी, गाजरे आणि बटाटेही असतात हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे काळ्या किंवा गडद जांभळ्या रंगाचे टोमॅटोही असतात. आपण केवळ हिरवे किंवा लाल टोमॅटो पाहत असलो तरी अशा काळ्या टोमॅटोंनाही (Black tomatoes) भरपूर मागणी आहे. या टोमॅटोंची खासियत म्हणजे कर्करोगाला दूर ठेवण्यासाठी हा टोमॅटो गुणकारी असल्याचे म्हटले जाते.

काळ्या टोमॅटोंना 'इंडिगो रोज टोमॅटो' असे म्हटले जाते. त्याचे उत्पादन सर्वात आधी इंग्लंडमध्ये झाले. या प्रजातीचे श्रेय रे ब्राऊन यांना जाते. त्यांनी जेनेटिक म्युटेशनच्या माध्यमातून काळ्या टोमॅटोंची निर्मिती केली. युरोपच्या मार्केटमध्ये त्याला 'सुपरफूड' म्हटले जाते. इंडिगो रोज रेड आणि जांभळ्या टोमॅटोंच्या बियांना एक करून ही नवी प्रजाती बनवली आहे. या हायब्रीड टोमॅटोसाठी भारतातील वातावरणही पोषक आहे. त्याची लागवडही लाल टोमॅटोसारखी केली जाते. मात्र, लाल टोमॅटोंच्या तुलनेत त्यांचे उत्पादन उशिरा होते. (Black tomatoes)

लागवड करण्यासाठी जानेवारी महिना चांगला मानला जातो. मार्च-एप्रिलच्या दरम्यान त्याचे उत्पादन मिळू शकते. काळ्या टोमॅटोमध्ये (Black tomatoes) लाल टोमॅटोपेक्षा जास्त औषधी गुण असतात. हे जास्त काळ ताजे राहतात. रक्तातील साखर कमी करणे, कोलेस्टेरॉल घटवणे यासाठीही हा टोमॅटो गुणकारी ठरतो. तो बाहेरून काळा आणि आतून लाल असतो.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT