Latest

BMC Covid Scam | आयकरचे पुणे, मुंबई, गुजरातमध्ये छापे

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : महामारीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कोविड -१९ केंद्रांमधील कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणाच्या संदर्भात मुंबईच्या आयकर तपास शाखेने अनेक शहरांमध्ये छापे टाकले आहेत. मुंबई, गुजरात, प्रयागराज, दिल्ली आणि पुण्यात डझनभर ठिकाणी ही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने करार केलेल्या अनेक कंपन्यांवर तसेच काही ठिकाणांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. (BMC Covid Scam)

संबंधित बातम्या 

याबाबतची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी X वर पोस्ट करत दिली आहे. मुंबईतील ऑक्सिजन प्लांट्स आणि कोव्हिड रुग्णालयांतील घोटाळ्याशी संबंधित बीएमसीच्या कंत्राटदारांवर आयकर विभागाने मुंबई, अहमदाबाद, पुणे आणि उत्तर प्रदेशात छापे टाकले असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. हिसाब तो देना पडेगा! असेही शेवटी त्यांनी म्हणत सूचक इशारा दिला आहे.

यापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि डॉ. किशोर यांना अटक केली होती. (BMC Covid Scam)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT