Latest

ALH ध्रवचे कोचीमध्ये ‘पोस्‍ट लँडिंग’; पायलट सुरक्षित

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) ALH ध्रुव मार्क III हेलिकॉप्टरचे जबरदस्तीने लँडिंग करण्याची घटना आज ( दि. २६ ) कोची येथे घडली.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, भारतीय तटरक्षक दलाचे (ICG) हे हलके हेलिकॉप्टर आहे. (ALH-DHRUV) मार्क 3 हेलिकॉप्टर रविवारी केरळच्या कोचीमध्ये चाचणी सुरू होती. हेलिकॉप्टरने उड्‌डान घेतले आणि ते सुमारे 25 फुटांपर्यंत उंचाचर गेले.

दरम्‍यान अचनाक काही बिघाड झाल्‍याने पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टरचे पोस्‍ट लँडिंग केले. पायलटच्या प्रसंगावधानामूळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ICG ALH ध्रुव फ्लीटचे कार्य पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने काम करत आहे, अशी माहिती आयसीजी (ICG) अधिकारी यांनी दिली.

.हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT