Latest

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, ७ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५०० कोटी जमा

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ दि. २० ऑक्टोबर 2022 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी राज्यातील ७ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते रिमोट क्लीक वरुन रु. २५०० कोटी रक्कम थेट जमा झाली. अशा प्रकारे एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजेनेची वैशिष्ट्ये

  • राज्यातील अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय.
  • नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देणारे महाराष्ट्र हे देशांतील पहिले राज्य.
  • प्रोत्साहनपर लाभ योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीद्वारे.
  •  २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या पैकी कोणत्याही दो व २०१९-२० या पैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ.
  •  राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा योजनेस पात्र.
  • शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र.
  •  राज्यातील अंदाजे १६ लाख पात्र शेतकऱ्यांना रु.४७०० कोटी प्रोत्साहनपर लाभ देण्याचे प्रस्तावित. उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२२ अखेर लाभ देण्यास राज्यशासन कटिबद्ध.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT