Latest

New Parliament Building Inauguration: विरोधकांशिवाय नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा अपूर्णच; सुप्रिया सुळे

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: संसदेच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा आज (दि.२८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. परंतु विरोधी पक्षाला या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील नाही. देशातील सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांचा सोयीप्रमाणे वापर केला जातोय. त्यामुळे या देशात लोकशाहीचे नाही, तर दडपशाहीचे सरकार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांशिवाय आजचा संसद भवनाचा उद्घाटन सोहळा हा अपूर्ण असल्याची खंत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.२८) संसदेच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा होत आहे. या संसदेच्या नवीन वास्तूला देशाला समर्पित करणार आहेत. नव्या संसद भवनाचा हा महासोहळा सध्या सुरू आहे, विरोधी पक्षाकडून या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. विरोधी पक्षांना देशाच्या कार्यक्रमाला निमंत्रण देणे सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य होते. परंतु कोणत्याही विरोधी राजकीय पक्ष किंवा नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देखील देण्यात आलेले नाही.

यावर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीचे जे मंदिर आहे ती संसदेची जुनी इमारतच आहे. त्यामुळे आम्हाला संसदेची जुनीच वास्तू प्रिय आहे. हे सरकार दडपशाहीचे आहे लोकशाहीचे नाही असे मत व्यक्त करत, संसदेचा इव्हेट करू नका, असे देखील सुळे यांनी सरकारला सुनावले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षाला नाही, तर राज्यसभेच्या अध्यक्षांना देखील का बोलावलं नाही, असा प्रश्न देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT