Latest

Gaur in Radhanagari : कोल्हापूर राधानगरीमध्ये गव्याने केला महिलेवर जीवघेणा हल्ला

backup backup

राधानगरी; पुढारी वृत्तसेवा : सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) तेथे शेतात काम करीत असलेल्या शेतकरी महिलेवर गव्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. अलका लहू चौगुले (वय ४५) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केले आहे. (Gaur in Radhanagari)

चौगुले या शेरी नावाच्या शेतात काम करत असताना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. चौगले याना मानेजवळ व पाठीच्या मणक्याला जबर मार लागला त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक उपचारांनंतर चौगुले यांना पुढील उपचारांसाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. (Gaur in Radhanagari) या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस.बी.बिराजदार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Gaur in Radhanagari : कोल्हापूर शहरात गव्याची दहशत

गव्याने ( bison ) कोल्हापूर शहरातून गुरुवारी पहाटे चांगलाच फेरफटका मारला. गुरुवारी रात्री दोन वाजता पितळी गणपतीजवळून बाहेर पडलेला गवा तब्बल 18 तासांनी शिंगणापूरजवळ पोहोचला. सुमारे दीड वर्षे वयाचा हा लहान गवा शहराबाहेर जावा, यासाठी पहाटेपासून सर्व शासकीय यंत्रणा या गव्याच्या मागावर आहेत.

या कालावधीत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरणार्‍या या गव्याने नागरिकांना ठिकठिकाणी मनसोक्त दर्शन दिले. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास गवा शिंगणापूर येथील चंबुखडी ते बालिंगा (ता. करवीर) या दरम्यान होता.

शुक्रवारपासून शहर आणि परिसरात धुमाकूळ घालणारा एकल गवा (Gaur) पेठवडगाव, भादोलेमार्गे शिगावच्या दिशेने सांगली जिल्ह्यात गेला. दरम्यान, बुधवारी सकाळी पुन्हा कोल्हापुरात दुसर्‍या गव्याचे दर्शन झाले. शुक्रवारी शहरात घुसलेला हाच गवा परत आला की हा नवा गवा आहे, याबाबत बुधवारी दिवसभर चर्चा सुरू होती. तथापि, गुरुवारी पहाटेपासून शहरात वावरणारा हा गवा नवा असून तो आकाराने लहान असल्याचे स्पष्ट झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT